शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

होळी छोटी.. स्मशानभूमीस मदत मोठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:12 IST

कोल्हापूर : पारंपरिक सणाचा उत्साह कायम ठेवत सार्वजनिक ठिकाणी साजरी होणारी होळी छोटी करून पंचगंगा स्मशानभूमीस सुमारे पाच लाख ...

कोल्हापूर : पारंपरिक सणाचा उत्साह कायम ठेवत सार्वजनिक ठिकाणी साजरी होणारी होळी छोटी करून पंचगंगा स्मशानभूमीस सुमारे पाच लाख शेणी दान करण्याचे औदार्य रविवारी कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कामी पुढाकार घेत महापालिकेच्या आवाहनास साथ दिली. सणातील पारंपरिक गोडवा व आनंद जपतही लोक पर्यावरणरक्षण, समाजहित या गोष्टींकडे वळत असल्याचे चांगले चित्र त्यातून पुढे आले. ही बदलत्या कोल्हापूरची मनोभूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.

कोल्हापूर शहर परिसरात होळी सण प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गल्ली-गल्लीत, चौका-चौकात उंच होळी करण्यात ईर्षा चाललेली पहायला मिळत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने होळी छोटी करून पंचगंगा स्मशानभूमीला शेणी व लाकडे दान करण्याचे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले होते. त्याला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्या दोन दिवसात स्मशानभूमीकडे सुमारे पाच लाख शेणी दान म्हणून जमा झाल्या आहेत. स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे यांनी शेणी दान स्वीकारल्या.

शेणी दान उपक्रमात यांचे योगदान महत्त्वाचे

१. साने गुरुजी वसाहत संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे शारंगधर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन लाख ५० हजार.

२. फुलेवाडीतील मानसिंग पाटीलप्रेमी ग्रुपतर्फे ५१ हजार.

३. कोल्हापूर जिल्हा कॅटरर्स असोसिएशनतर्फे ५१ हजार,

४. ब्राह्मणसभा करवीरतर्फे १५ हजार.

५. अचानक तरुण मंडळातर्फे २५ हजार.

६. निवृत्ती तरुण मंडळातर्फे ११ हजार.

७. सम्राट फ्रेंड‌्स सर्कलतर्फे ११ हजार.

८. सरोज इंडस्ट्रीजतर्फे अजित जाधव यांनी दहा हजार.

९. रोहित घळसाशी मित्रपरिवार यांच्यातर्फे ६ हजार.

१०. शिवाजी पार्क विकास मंचतर्फे पाच हजार., दत्तलक्ष्मी कॉलनी व व्यंकटेश कॉलनीतर्फे ५ हजार.

११. शिवतेज खराडे यांच्यातर्फे ५ हजार.

१२. नवनाथ करके यांच्यातर्फे ५ हजार.

१३. राजलक्ष्मी फाउण्डेशनतर्फे ५ हजार.

१४. कॅसेट ग्रुपतर्फे ५ हजार.

१५. जयभवानी स्पोर्ट‌्सतर्फे ५ हजार.

१६. उदय राजाराम माळी यांच्यातर्फे २ हजार.

फोटो क्रमांक - २९०३२०२१-कोल-केएमसी शेणीदान ०१/०२

ओळ - कोल्हापूर शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी होळी छोटी करून पंचगंगा स्मशानभूमीस मोठ्या प्रमाणात शेणी दान केल्या. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. (छाया. नसीर अत्तार)