शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला पकडा, सहनशीलता पाहू नका -उद्या गडहिंग्लजला मोर्चा

By admin | Updated: July 30, 2014 00:42 IST

चंद्रकांत पाटील : ‘बसर्गे’प्रकरणी पोलीस उपअधीक्षकांची घेतली भेट

गडहिंग्लज : बसर्गेच्या तरुणीवरील बलात्काराच्या घटनेला १५ दिवस उलटून गेले तरीही आरोपी सापडत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्या. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, चार दिवसांत आरोपीला पकडा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला.बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी येथील पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास इंगवले उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, मोठ्या शहरात घडणाऱ्या अशा घटना ग्रामीण भागात घडत आहेत ही गंभीर बाब आहे. जनतेच्या संरक्षणाची व सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर आहे. बसर्गेच्या घटनेतील आरोपी सापडला नाही तर लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल. यावेळी पाटील व इंगवले यांनी तपासाबद्दल माहिती दिली. बसर्गे प्रकरणाच्या तपासासाठी चार विशेष पथके नेमली असून, सर्व स्तरावर कसून चौकशी सुरू आहे. मोर्चे, आंदोलन न करता माहिती देण्यासाठी लोकांनीही पुढे यावे. पोलिसांना वेळ द्यावा. निश्चितपणे या प्रकरणाचा छडा लावला जाईल. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, सरचिटणीस अनिल खोत, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. टी. एम. राजाराम, प्रा. अमृतराव देसाई, मार्तंड जरळी, प्रीतम कापसे, आनंद पेडणेकर, सुरेश काळगे, बाळू दोरूगडे, मनीष हावळ, विजय मगदूम, बसवराज कंकणवाडी, रणजित कुडाळकर, शिवकृष्ण ढंगे, आदीं उपस्थित होते.