शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित तरुणीला अटक

By admin | Updated: April 9, 2015 00:59 IST

लॅपटॉप, दागिन्यांची चोरी : पुणे, कोल्हापूर येथील वसतिगृहांतील चोऱ्यांची कबुली

कोल्हापूर : शिक्षण व नोकरीचा बहाणा करीत मुलींच्या वसतिगृहांत राहून लॅपटॉप, पैसे व दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत उच्चशिक्षित तरुणीला बुधवारी करवीर पोलिसांनी अटक केली. संशयित प्रियांका अशोक धनाले (वय २७, रा. नागरमन्नोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे तिचे नाव आहे. तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरी करून त्या चीजवस्तूंची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून ती ऐषारामीचे जीवन जगत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले, आर. के. नगर येथील एस. एल. मुलींच्या वसतिगृहाच्या रूम नं. १०७ मधून दि. २० डिसेंबर २०१४ रोजी कोमल सूर्यकांत होगले (२२, रा. औरंगाबाद) हिचा लॅपटॉप व पैसे चोरीला गेले होते. यावेळी तिच्या रूममध्ये राहत असलेली प्रियांका धनाले गायब झाल्याने संशय बळावला होता. त्यामुळे कोमल होगले हिने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यापासून करवीर पोलीस तिचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी ती पुन्हा याच परिसरात फिरत असताना होगले हिला दिसली. तिने याची माहिती पोलिसांना दिला. पोलिसांनी मंगळवारी दुपारी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व रोख २ हजार ६०० रुपये हस्तगत केले. संशयित प्रियांका धनाले हिचे आई-वडील शेती करतात. एक भाऊ असून ती अनेक वर्षांपासून बाहेर पडली आहे. ती बी.ई. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्याचे सांगून आर. के.नगर येथील मुलींच्या वसतिगृहात राहण्यास आली होती. तेथून दोन दिवसांत चोरी करून ती गायब झाली होती. (प्रतिनिधी) सोडविण्यासाठी धडपड संशयित प्रियांका धनाले हिला करवीर पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने कोल्हापुरातील स्थानिक महिला वकिलाला फोन करून आपणाला यातून सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी त्या वकील महिलेची करवीर पोलीस ठाण्यात लुडबुड सुरू होती. चोरी केल्यानंतर पोलिसांनी पकडल्यास पुढची तयारीही तिने करून ठेवल्याचे दिसून आले. आई-वडिलांनी नाकारलेप्रियांका धनाले हिला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिचे मूळ गाव विचारून घेतले. त्यानुसार तिचे आई-वडील व भावाशी संपर्क साधून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ‘तिचे आम्हाला काही सांगू नका,’ असे म्हणून मोबाईल बंद करून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.