शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

Kolhapur: ‘बिद्री’च्या डिस्टिलरी'चे निलंबन अखेर स्थगित, के. पी. पाटील यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:44 IST

पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करून केली होती कारवाई

सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री तपासणी करून परवाना रद्दच्या केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबत आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला व फिर्दोश पुणीवाला यांनी निर्णय दिला. या निर्णयाने अध्यक्ष के. पी. पाटील यांना मोठा दिलासा मिळाला.बिद्री साखर कारखान्याने उपपदार्थ निर्मितीचा डिस्टिलरी प्रकल्प उभारला आहे. २१ जून रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाच्या पथकाने कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची रात्रीच अनुषंगिक तपासणी केली होती. या तपासणीत काही त्रुटी असल्याचे कारण पुढे करून प्रकल्प सील केला होता. तसेच प्रकल्पाचा उत्पादन परवानाही निलंबित केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई चुकीची असल्याने याबाबत कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेची सहावेळा सुनावणी झाली. त्यामध्ये कारखाना व राज्य उत्पादन शुल्क विभाग या दोघांच्याही बाजू समजावून घेण्यात आल्या. कारखान्याच्या बाजूचा विचार करून न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत डिस्टिलरी प्रकल्पावर झालेली कारवाई स्थगित केली आहे. कारखान्याकडून ॲड. डी. बी. सावंत व ॲड. विनायक साळोखे यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस. डी. व्यास यांनी काम पाहिले.

बिद्री साखर कारखाना हा ६८ हजार सभासदांचा तसेच ऊस उत्पादकांचा आहे. हा कारखाना राधानगरी-भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील लाखो शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्यामुळे या कारखान्यावर झालेली कारवाई चिंताजनक होती. याबाबत उच्च न्यायालयाने कारखान्याची योग्य बाजू समजावून घेत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला आहे. - के. पी. पाटील अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेK P. Patilके. पी. पाटीलCourtन्यायालय