शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- बाईक रायडर अपघात: हेल्मेट कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:47 IST

तपास सुरू, धोकादायक वळणांवर फलक लावण्याच्या सूचना

कोल्हापूर : आजरा-आंबोली मार्गावर माद्याळ फाट्याजवळ रविवारी (दि. २०) झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातातील दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी कॉलनी, टाकाळा) याच्या हेल्मेट कॅमेऱ्याचे फुटेज आजरा पोलिसांच्या हाती लागले आहे. फुटेजची तपासणी सुरू असून त्यातून अपघात नेमका कसा झाला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.दोन दिवसांत याबाबत ठोस माहिती मिळेल, अशी माहिती आजरा पोलिसांनी दिली तसेच आजरा-आंबोली मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.भरधाव दुचाकीने कारला धडक दिल्यानंतर बाईक रायडर सिद्धेश रेडेकर याच्या डोक्यावरील हेल्मेट फुटून बाजूला पडले होते. त्यावरील कॅमेरा तुटून पडला होता. घटनास्थळाचा पंचनामा करताना आजरा पोलिसांना सिद्धेशचे हेल्मेट मिळाले. मात्र, कॅमेरा मिळाला नव्हता. पोलिसांनी रविवारी सायंकाळी पुन्हा घटनास्थळी जाऊन शोधमोहीम राबवली. त्यावेळी बाजूला पडलेला कॅमेरा पोलिसांना मिळाला.तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. यावरून दुचाकीचा वेग समजण्याची शक्यता आहे तसेच अपघात नेमका कसा घडला याचेही कारण समोर येईल, अशी माहिती आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी दिली.

रस्ता बनला धोकादायकआजरा-आंबोली मार्गाचे रूंदीकरण केल्यानंतर वाहनांचा वेग वाढला आहे. प्रशस्त रस्त्यांवरून वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे धोकादायक वळणांवर सूचनाफलक लावून अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस