Kolhapur-Jotiba Chaitra Yatra 2026: अवजड वाहनांना सोमवारपासून जोतिबा डोंगरावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:14 IST2026-03-28T17:14:39+5:302026-03-28T17:14:58+5:30

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान होत असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त सोमवारपासून (दि. ३०) मालाने भरलेले ...

Heavy vehicles banned from mountains from Monday on the occasion of Jyotiba Chaitra Yatra | Kolhapur-Jotiba Chaitra Yatra 2026: अवजड वाहनांना सोमवारपासून जोतिबा डोंगरावर बंदी

Kolhapur-Jotiba Chaitra Yatra 2026: अवजड वाहनांना सोमवारपासून जोतिबा डोंगरावर बंदी

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान होत असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त सोमवारपासून (दि. ३०) मालाने भरलेले ट्रक, अवजड वाहने, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना डोंगरावर केर्ली, कुशिरे, वाघबीळ, गिरोली या नाकाबंदी ठिकाणाहून पुढे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी हे निर्बंध घातले आहेत. वाहतुकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंदीचे नियम १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेपर्यंत राहतील.

मुख्य यात्रा १ तारखेला असून या दिवशी सकाळी ५ वाजल्यापासून दुचाकी वाहनांना डोंगरावर दानेवाडी क्रॉसिंग आणि जुने आंब्याचे झाड, गिरोली फाटा येथून प्रवेश दिला जाणार नाही. पार्किंगच्या ठिकाणाहून मोफत एसटी किंवा केएमटीचा वापर करावा. डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यान वाहतूक दोन्ही मार्गाने सुरू राहील.

दर्शनानंतर परत जाणाऱ्या भाविकांनी गिरोली मार्गे तसेच जुने आंब्याचे झाड ते गायमुख ते केले मार्गे किंवा दानेवाडी, वाघबीळ मार्गे मार्गस्थ व्हावे. १ तारखेला दुपारी ४ वाजल्यापासून केर्ली फाटा व गिरोली गावचा टी पॉइंट रस्ता तसेच इतर कोणत्याही मार्गावरून जोतिबा डोंगरावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

पालखीसाठी भाविकांनी दुपारी ४ पूर्वी डोंगरावर पोहोचावे. केली ते जुने आंब्याचे झाड ते दानेवाडी क्रॉसिंग ते रेस्ट हाऊस ते सेंट्रल प्लाझा ते यमाई टोल नाका ते गिरोली फाटा ते दानेवाडी रस्त्यावरील निलगिरी बाग या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व वाहन पार्किंग करण्यास मनाई आहे. कांनी, दोनवाडी फाटा मार्गे माले फाटा/वाघबीळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ व्हायचे आहे.

वाहन पार्किंग

- सासन काठी राखीव, सेंट्रल प्लाझा येथे ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर व इतर मोठी वाहने
- गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी : यमाई वळणावर, डावी-उजवी बाजू, बुने कॉर्नर, श्रावणी हॉटेलमागे, केएमटी स्टॉपच्या बाजूला, निलगिरी बाग, दोनवाडी फाटा व बुणे.
- केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी : जुने एसटी स्टॅन्डसमोर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एसटी स्टॅन्डच्या पाठीमागे, जुने आंब्याचे झाड, गायमुख इनाम पार्किंग.

Web Title : कोल्हापुर जोतिबा यात्रा 2026: जोतिबा पहाड़ी पर भारी वाहनों पर प्रतिबंध

Web Summary : चैत्र यात्रा के लिए 30 मार्च से जोतिबा पहाड़ी पर भारी वाहनों पर प्रतिबंध लगा दिया गया है। प्रतिबंधों में ट्रक, रिक्शा और ट्रेलर शामिल हैं। दोपहिया वाहनों पर प्रतिबंध 1 अप्रैल से शुरू होगा। भक्तों के लिए वैकल्पिक मार्ग और पार्किंग क्षेत्र निर्धारित हैं; दिशानिर्देशों का पालन करें।

Web Title : Kolhapur Jotiba Yatra 2026: Heavy Vehicles Banned from Jotiba Hill

Web Summary : Heavy vehicles are banned from Jotiba hill starting March 30 for the Chaitra Yatra. Restrictions include trucks, rickshaws, and trailers. Two-wheeler restrictions begin April 1. Alternate routes and parking areas are designated for devotees; follow guidelines.