पन्हाळा: उष्म्याचा कडेलोट झाल्यानंतर रविवारी सायंकाळी विजांच्या लखलखाट आणी वादळी वाऱ्यासह एक तास पाऊसाची जोरदार हजेरी लावत सलग एक तास पाऊस पन्हाळगडावर पडल्याने नागरीकांना उष्म्या पासून थोडा दिलासा मिळाला. पन्हाळ्यावर येणाऱ्या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ्या दोन शिळा कोसळल्याने काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसाची एक तासात २२ मि.मी. नोंद झाली.
कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्यावर गेले काही दिवस झाले नागरिक उष्म्याने हैराण झाले होते उष्म्याच्या त्रासाने गडावर पर्यटकांनी पाठ फिरवली होती सर्वच जण उन्हाच्या झळांमुळे हैराण झाले होते रविवारी सकाळी पासुनच वातावरणात बदल झाला होता पाऊसाची सर्व जण प्रतीक्षा करत होते अचानक सायंकाळी पाच वाजता सोसाट्याच्या वादळी वाऱ्या बरोबरच विजांच्या कडकडाटात एक तास पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण शहरात पावसाने पाणी - पाणी करुन टाकले.
दरम्यान दुपारपासूनच वीज मंडळाने विद्युत पुरवठा खंडित केला होता पडलेल्या जोरदार पावसामुळे नागरीकांना उष्म्यात थोडा दिलासा मिळाला असला तरी ढगाळ वातावरण कायम राहिल्याने पुन्हा रात्री पाऊस पडण्याची शक्यता दाट होती पाऊस व विजेने झाडांची पडझड झाली नसली तरी मुख्य रस्त्यावर मोठ्या दोन शिळा कोसळल्यामुळे काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती.