शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोल्हापुरात अतिवृष्टी, एका रात्रीत नद्या पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 6:55 PM

Rain Kolhapur : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने एका रात्रीत जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या, तर तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले.

ठळक मुद्देकोल्हापुरात अतिवृष्टी, एका रात्रीत नद्या पात्राबाहेर गगनबावड्यात ढगफुटीसदृश १८२ मिलिमीटर पावसाची नोंद : ४३ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने एका रात्रीत जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या, तर तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले.

पंचगंगेची पाणीपातळी अवघ्या काही तासांत १० फुटांनी वाढली. गगनबावड्यात तर ढगफुटीसदृश १८२ मिलिमीटर इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. एका रात्रीच्या पावसाने पूर येण्याची जून महिन्यातील आतापर्यंतच्या पावसाची ऐतिहासिक घटना ठरली आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण तेव्हा पावसाने हुलकावणी दिली आाणि बुधवारपासून पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आल्यानंतर मात्र पावसाने जोरदार एन्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जूनमधील पावसाला जोर नसतो, असाचा पारंपरिक अंदाज बांधून सर्व जण गाफील राहिले; पण पावसाने रात्री जोरदार हिसका दाखवत सर्वांचीच फजिती केली. रात्री १० वाजता सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळीपर्यंत अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढले. टपोऱ्या थेंबाच्या आवाजाने अनेकांनी रात्र जागूनच काढली.रात्री अकराच्या सुमारास पावसाचा वेग वाढेल, तसे नद्यांवरील एका पाठोपाठ एक बंधारे पाण्याखाली जाऊ लागले. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी सकाळी २४ फुटांवर गेली. राधानगरी व दूधगंगा खोऱ्यात अतिवृष्टी झाल्याने याला जोड असणाऱ्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीवरील सर्वाधिक बंधारे वेगाने पाण्याखाली गेले. यात पंचगंगा व हिरण्यकेशी नदीवरील ७, भोगावती व दूधगंगा, वारणा नदीवरील २, तुळशी व कुंभी नदीवरील ४, कासारी नदीवरील एक, कुंभीवरील ४, घटप्रभा नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ८ बंधारे पाण्याखाली गेले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर