कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाचा दणका, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 22:48 IST2025-03-25T22:43:48+5:302025-03-25T22:48:23+5:30
जिल्ह्यात रात्री साडेनऊच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. गेली काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाचा दणका, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
कोल्हापूर/आजरा: जिल्ह्यात रात्री साडेनऊच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. गेली काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. तर रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
आजऱ्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह सायंकाळी वळीव बरसला. बहिरेवाडी परिसरात गारांचा वळीव पाऊस प्रचंड झाला. पावसामुळे वीट भट्टी व्यवसायिकांची तारांबळ उडाली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून तर झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. बहिरवाडी परिसरात गारांचा पाऊस झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाचा दणका, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा pic.twitter.com/ReXqRDBxyc
— Lokmat (@lokmat) March 25, 2025
उखाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा
सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस, सांगली मिरज रोडवरील झाडांच्या काही फांद्या पडल्याने वाहतूकीवर परिणाम, विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार, कुंडल विटा व वाळवे तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला.