Heavy rain in many places in the district | जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

ठळक मुद्देजिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊसशेतकऱ्यांसह सगळ्यांचीच तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. गगनबावडा, करवीर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळ पासूनच पावसाची भुरभुर सुरू होती. काही वेळ ऊन पडल्यानंतर पाऊस गेला असे वाटत असताना अचानकच ढग दाटून यायचे आणि पाऊस सुरू व्हायचा. दिवसभरात अनेक वेळा कोल्हापूर शहरात हजेरी लावली.

दुपारी तीन वाजता, गगनबावडा, करवीर, राधानगरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. साखर कारखान्यांची ऊस तोडणी खोळंबल्या असून रस्त्या लगतचा ऊस तोडणीशिवाय मजूरांकडे पर्याय नाही. गुऱ्हाळघरांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

Web Title: Heavy rain in many places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.