शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
5
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
6
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
7
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
8
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
9
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
10
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
11
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
12
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
13
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
14
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
15
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
16
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
17
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
18
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
19
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
20
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगा इशाऱ्या पातळीकडे, ५८ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:35 IST

गगनबावड्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी, एस. टी. चे चार मार्ग ठप्प

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर उघडझाप असली तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी अडीच फुटांनी वाढली असून इशारा पातळीकडे आगेकूच सुरू केली आहे. जिल्ह्यात ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे.शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी गगनबावडा तालुक्यात तब्बल ११९.८ मिलीमीटर पाऊस झाला. आजरा, भुदरगड, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस झाला.रविवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह शेजारील तालुक्यात उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात पाऊस आहे. राधानगरी धरणाचे ४,५,६ हे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असून प्रतिसेकंद ५७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून १३ हजार ५३० तर दूधगंगा धरणातून १६०० घनफूट पाणी सुटले आहे. त्यामुळे नद्यांची पातळीत वाढ होत आहे.

पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊन ती ३५.११ फुटांवर पोहचली होती, पंचगंगेने इशारा (३९ फूट) पातळीकडे आगेकुच सुरू केल्याने कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर पडली आहे.दरम्यान, जिल्ह्यात २० खासगी मालमत्तांची पडझड होऊन ६ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

आठ मार्ग बंद..जिल्ह्यातील दोन राज्य तर सहा प्रमुख जिल्हा मार्ग असे आठ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे.

एस. टी. चे चार मार्ग पूर्णपणे ठप्पएस.टी.चे चंदगड ते भोगोली, चंदगड ते पिळणी व चंदगड ते बोवाची वाडी त्याचबरोबर गडहिंग्लज ते काेवाडे व राधानगरी ते पडळ हे मार्ग पूर्णपणे बंद आहेत.