Heavy rain continued for the second day in the district | जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

ठळक मुद्देजिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊसअल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी शनिवारीही जोरदार पाऊस कोसळला. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. ११ वाजता अनेक तालुक्यांत पाऊस झाला.

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाऊस झाला. काही ठिकाणी धुवाधार पावसाने झोडपून काढले. शनिवारी सकाळी करवीर, पन्हाळा, राधानगरी, आदी तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. सकाळी ११ वाजता कागल, गडहिंग्लज परिसरांत पाऊस झाला.

दिवसभरात ढगाळ वातावरण राहिले तर काही तालुक्यांत तुरळक सरी कोसळल्या. आज, रविवारी सकाळी सूर्यप्रकाश राहिला तरी दिवसभरात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राधानगरी धरणात 233.45 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 30422 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 105.15 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा - तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.57 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.11 दलघमी, पाटगाव 104.70 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.40 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 43.45 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी

बंधाऱ्यांची पाणी पातळी - राजाराम 11.5, सुर्वे 13.8 फूट, रुई 40.4 फूट, इचलकरंजी 26 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 27.6 फूट, नृसिंहवाडी 26.6 फूट, राजापूर 15.3 फूट तर नजीकच्या सांगली 7.3 फूट व अंकली  7 फूट अशी आहे.

Web Title: Heavy rain continued for the second day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.