शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

अंगाची लाही-लाही करणारा उष्मा,तापमान ४१ डिग्रीवर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 6:36 PM

कोल्हापूरचे तापमान ४१ डिग्रीवर कायम राहिल्याने सोमवारी दिवसभर उष्म्याने अंगाची लाही-लाही होत होती. मंगळवारपासून जिल्ह्याच्या तापमानात थोडी घसरण होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

ठळक मुद्दे अंगाची लाही-लाही करणारा उष्मा,तापमान ४१ डिग्रीवर कायमपारा कमी होण्याचा अंदाज

कोल्हापूर : कोल्हापूरचेतापमान ४१ डिग्रीवर कायम राहिल्याने सोमवारी दिवसभर उष्म्याने अंगाची लाही-लाही होत होती. मंगळवारपासून जिल्ह्याच्या तापमानात थोडी घसरण होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.कोल्हापूरचा पारा एवढा कधीच वाढला नव्हता. या वर्षीच ४० डिग्रीच्या पुढे पारा जात असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी सकाळपासूनच अंग तापण्यास सुरुवात झाली. सकाळी अकरानंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. दुपारी सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत होता.

रस्त्यावरून जाताना अंगावर येणाऱ्या उन्हाच्या गरम झळा सोसवत नव्हत्या. सायंकाळचे पाच वाजले तरी तापमान ३९ डिग्रीपर्यंत राहिल्याने उन्हाची तिरीप चांगलीच होती. त्यानंतर तापमान हळूहळू कमी होत गेले तरी किमान तापमान २४ डिग्रीवर कायम राहिल्याने वातावरणातील उष्मा कायम होता. मंगळवारी तापमानात किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे; पण वळीव पावसाची येत्या दोन-तीन दिवसांत तरी शक्यता नसल्याचा अंदाज आहे.

शेतीच्या कामावर परिणामजीवघेण्या उष्म्याचा फटका शेतीकामाला बसला आहे. सध्या शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत मग्न आहे; पण दुपारी बारानंतर शिवारात काम करायचे म्हटले की जीव घायकुतीला येत आहे.

वीज गायब... जीव कासावीससोमवार असल्याने सकाळपासूनच कोल्हापूर शहरात विजेचा लपंडाव सुरू होता. अर्धा, एक तास वीज गायब झाल्याने कार्यालये, घरातील पंखे, ए. सी. बंद पडले होते. त्यामुळे या कालावधीत घरात अथवा कार्यालयात बसताना जीव कासावीस होत होता. 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर