शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

देव घडविण्याच्या कामाचा श्रीगणेशा

By admin | Updated: July 7, 2015 23:52 IST

गणेशोत्सवाची तयारी : कुंभारवाड्यात लहानमोठ्या गणेशमूर्ती साकारू लागल्या

कोल्हापूर : गणेशोत्सवाला अडीच महिन्यांचा कालावधी असल्याने आता कुंभारवाड्यात लाडक्या गणरायाच्या आकर्षक मूर्ती साकारू लागल्या आहेत. पावसाची उघडीप आणि अधिक महिन्यामुळे उत्सवाची पुढे गेलेली तारीख यामुळे कुंभार बांधवांनी आता देव घडविण्याच्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यामुळे यंदा सगळे सण एक महिन्याने पुढे गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी आॅगस्टमध्ये येणारा गणेशोत्सव यंदा १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे अजून अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने कुंभार बांधवांनाही मूर्ती बनविण्यासाठी बऱ्यापैकी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे अजूनही मूर्ती बनविण्याच्या कामाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. मात्र, देव घडविण्याच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरीतील कुंभार गल्ली आणि गंगावेश, पापाची तिकटी परिसरातील कुंभार बांधवांच्या घरांसमोर आता पत्र्याचे शेड उभारले आहेत. घरगुती गणेशमूर्ती बनवायला फार वेळ लागत नाही; त्यामुळे सध्या मंडळांच्या मोठ्या म्हणजे पाच ते दहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिस, नारळाच्या शेंड्या यांचा लगदा करून साचा करून काही मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांत गणेशमूर्तींच्या ठरलेल्या आॅर्डर आहेत, त्या कुंभार बांधवांनी मात्र लहान मूर्तीही साकारायला सुरुवात केली आहे. पाऊस असला की, मूर्ती वाळायला वेळ लागतो; पण आता पावसाने उघडीप दिल्याने मूर्ती घडविण्यातही फारशा अडचणी येत नाहीत. मोठ्या गणेशमूर्ती मार्केट यार्ड व बापट कॅम्प परिसरात घडविल्या जात आहेत. त्र्यंबोली यात्रेनंतरच येणार वेगआषाढात मंगळवारी व शुक्रवारी नदीला आलेले नवे पाणी त्र्यंबोली देवीला यात्रा करून वाहण्याची पद्धत आहे. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेनंतरच गणेशोत्सवाच्या तयारीला खरा वेग येणार आहे. आता काही मंडळे ठरलेल्या कुंभारांकडे मूर्ती बनविण्याची आॅर्डर देत आहेत. गेल्या काही वर्षांत देखावे करण्याऐवजी आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली जात असली तरी बहुतांश मंडळांनी एकच गणेशमूर्ती कायमस्वरूपी ठरवून दागिने बनवून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य तर वाढतेच; पण मंडळांकडेही संपत्ती जमा होते.