शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

त्याने चक्क अडवली ऑक्सिजनवाहक बस, तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 20:30 IST

Crimenews Kolhapur : कोरोनाचा संसर्ग वाढताना तोंडावरील मास्क काढण्याचे आवाहन करत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दरम्यान त्या माथेफिरूने चक्क ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या केएमटी बसला अटकाव केला. कर्मचाऱ्यांना मास्क काढायला लावला. असे कृत्य करणाऱ्या आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुहास गणेश पाटील (वय ३०, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड) याला मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देत्याने चक्क अडवली ऑक्सिजनवाहक बस, तरुणास अटकमास्कबाबत दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर केला व्हायरल

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढताना तोंडावरील मास्क काढण्याचे आवाहन करत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दरम्यान त्या माथेफिरूने चक्क ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या केएमटी बसला अटकाव केला. कर्मचाऱ्यांना मास्क काढायला लावला. असे कृत्य करणाऱ्या आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुहास गणेश पाटील (वय ३०, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड) याला मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढता मृत्यू दरही चिंताजनक आहे. त्यासाठी शहरातील दवाखाने आणि कोविड सेंटरसाठी ऑक्सिजनची वाढती गरज ओळखून कोल्हापूर महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा करणारी बस तैनात केली. चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली ही बस २४ तास कार्यरत ठेवली आहे.

शनिवारी दुपारी सानेगुरुजी वसाहतीकडून क्रशर चौकाकडे ही बस येत होती. चौकानजीक रस्त्यात खोदकाम केल्याने ही बस वनवे मार्गावरून जाताना सुहास पाटील या माथेफिरूने आपली दुचाकी आडवी मारून बस रोखली. ती पुन्हा मागे घेण्यास भाग पाडली. वन वे तून पुन्हा यायचे नाही अशी मग्रुरीची भाषा वापरली, तसेच त्या बसवरील विनंती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रोखले. त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावरील मास्क आपल्या हाताने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला.खाक्या दाखवताच भूमिका बदललीतत्पूर्वी, सुहास पाटील याने रस्त्याकडेला बसलेल्या एका महिलेलाही कोरोना अस्तित्वात नसल्याचे सांगून त्यांचा मास्क काढण्यास भाग पाडले. चुकीचा संदेश पसरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तर मंगळवारी दुपारी त्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्याला पोलिसांनी ह्यखाक्याह्ण दाखवताच त्याने आपली भूमिका बदलत मास्क तोंडावर घालण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस