शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हवालदिल पोल्ट्रीधारकांना व्याज सवलतीच्या बूस्टरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाने पोल्ट्रीधारकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत. ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाने पोल्ट्रीधारकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत. त्यापैकी शंभरहून अधिक जिल्हा बँकेचे कर्जदार असून, कर्जाचे हप्ते भरायचे कसे, या विवंचनेत शेतकरी असून, बँकेने किमान व्याजमाफी करावी, अशी मागणी होत आहे.

कोरोनानंतर ‘बर्ड फ्लू’चे संकट आणि आता पुन्हा लॉकडाऊन यामुळे पोल्ट्री व्यवसाय पुरता उद्‌ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक आहेत. या व्यवसायातील अनिश्चितपणामुळे त्यातील हजारहून अधिक पोल्ट्री बंद पडल्या आहेत. ज्या सुरू आहेत, त्याही अडचणीत आहेत. दुसरा पर्याय नसल्याने पक्ष्यांचे संगोपन करावे लागत आहे. विविध बँकांकडून कर्जे काढली आहेत. त्याचा हप्ता भरता आलेला नाही. जूनच्या हप्त्यासाठी तगादा लागला आहे. पक्ष्यांच्या संख्येनुसार दहा लाखांपासून तीस लाखांपर्यंत बँकांकडून कर्जे घेतलेली आहेत. त्यातील शंभरहून अधिक पोल्ट्रीधारकांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले आहे. या व्यवसायातून चार पैसे मिळू लागल्याने हजारो शेतकरी याकडे वळले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक आरिष्टात पोल्ट्री व्यवसाय अडकला आहे. ‘बर्ड फ्लू’च्या अफवेने तर गल्लाेगल्ली फिरून कोंबड्या विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. अक्षरश: फुकापासरी किमतीने काेंबड्या विकल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

बँकेचे अधिकारी वसुलीसाठी दारात येऊ नयेत, यासाठी उसनवार करणे, जादा व्याजाने इतर वित्तीय संस्थांकडून पैसे उचलण्यापलीकडे शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने केवळ व्याज माफ केले, तर तेवढा हातभार शेतकऱ्यांना लागू शकतो. किमान ज्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही, अशांना व्याजात सवलत दिली तरी शेतकरी तग धरू शकणार आहेत.

शेतकऱ्यांना सवलती देणारी जिल्हा बँक

जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त योजना राबविल्या आहेत. पाच लाखांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी कर्ज देणारी राज्यातील पहिली बँक आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पोल्ट्रीधारकांना व्याज सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोट-

जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करून त्यातून संसाराचा गाडा चालवीत बँकेचे हप्ते भरले. व्यवसाय अडचणीत आल्याने कर्ज फेडता येईना, जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ हे शेतकरी व गरिबांचे कैवारी आहेत, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या, ते आम्हालाही या संकटातून वाचवतील.

- भारती पाटील (पोल्ट्रीधारक, शेतकरी)

लॉकडाऊनमुळे पोल्ट्रीधारकांप्रमाणेच इतर कर्जदारही अडचणीत आले आहेत. त्यांनी कर्जाची किती उचल केली, व्याज सवलतीचा किती बोजा पडेल, याची माहिती घ्यावी लागेल.

- हसन मुश्रीफ (ग्रामविकास मंत्री, अध्यक्ष जिल्हा बँक)