कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बुधवारी नंदुरबारचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले नव्हते. मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वी कोल्हापूरसह अहिल्यानगर, वाशिम, रत्नागिरी व बुलढाणा या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. तोंडावर १ मे आहे. शिवाय नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वत: मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदात जास्त रस असताना राज्य सरकार त्यांना शेकडो मैल लांबच्या जिल्ह्याची जबाबदारी देत आहे.
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडले होतेदरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले होते. मात्र, कोल्हापूर ते वाशिम असा सुमारे ६०० किलोमीटरचा लांब प्रवास करणे जिकिरीचे ठरत असल्याने त्यांनी मार्च २०२५ मध्ये ते पद सोडले होते.
Web Summary : Hasan Mushrif, Medical Education Minister, is now Guardian Minister of Nandurbar. Despite his interest in Kolhapur, the government assigned him this distant responsibility, preceding local elections and the new fiscal year.
Web Summary : चिकित्सा शिक्षा मंत्री हसन मुश्रीफ अब नंदुरबार के पालक मंत्री हैं। कोल्हापुर में उनकी रुचि के बावजूद, सरकार ने उन्हें स्थानीय चुनावों और नए वित्तीय वर्ष से पहले यह दूरस्थ जिम्मेदारी सौंपी।