शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘अपंग कल्याण’चा कारभार चालतो 'उसन्यां'वर

By admin | Updated: January 21, 2015 23:59 IST

हव्या त्यावेळी उसने कर्मचारी घेऊन आपलीच एक नियमावली तयार करून येणाऱ्या अपंगांवर लादली जात आहे. येथील गलथान, भोंगळ, मनमानी कारभाराचा त्रास अपंगांना होत आहे.

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -अपंगांना मार्गदर्शन करून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ‘कल्याण’ करण्याची जबाबदारी असणाऱ्या येथील जिल्हा परिषद अपंग कल्याण विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. एकटे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते कारभार हाकत आहेत. हव्या त्यावेळी उसने कर्मचारी घेऊन आपलीच एक नियमावली तयार करून येणाऱ्या अपंगांवर लादली जात आहे. येथील गलथान, भोंगळ, मनमानी कारभाराचा त्रास अपंगांना होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यालयात येण्यासाठी तयार केलेल्या रँपसमोर दुचाकी पार्किंग केली जाते. परिणामी, हा विभाग नेमके कुणाचे कल्याण करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपंग कल्याण विभाग हा समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांच्याच अखत्यारित येतो. या विभागात अध्ययन सल्लागार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अशी महत्त्वाची पदे मंजूर आहेत. त्यातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते शंकर फडतरे कार्यरत आहेत. उर्वरित पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. जिल्ह्यातील अपंग शाळांची नोंदणी व नूतनीकरण करणे, अपंग शाळांचे अनुदान निर्धारण करणे, आदी कामांची जबाबदारी या विभागावर आहे. परंतु, यातील बहुतांश जबाबदारी विभागाकडून पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी आहेत येथील ‘उसने’ कर्मचारी आपण अपंगांचे काम करतो, म्हणजे त्यांच्यावर मेहरबानीच करत असल्याच्या अविर्भावात असतात. ‘उसन्या’ कर्मचाऱ्यांकडून अपंगांना ‘उपऱ्याची’च वागणूक मिळत आहे. व्हीलचेअरवरून येणाऱ्या अपंगांसाठी रँप आहे. मात्र, रँपसमोरच अनेक दुचाकी लावलेल्या असतात. रँपसमोरची वाहने काढण्यास लावावे, असे अधिकाऱ्यांनाही वाटत नाही.