शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

गुजरी सराफ दूकानातील तिजोरी मिरजेत सापडली, पुणे-पिंपरी येथील चोरट्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 4:36 PM

महाव्दार रोड व गुजरी परिसरात दोन सराफ दुकाने फोडून चोरट्यांनी २२ लाख किंमतीचे ६० तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. यावेळी प्रमोद कोलेकर यांच्या दुकानातून लंपास केलेली तिजोरी मिरज फाटा येथे रस्त्याकडेला रिकाम्या अवस्थेत पोलीसांना मिळून आली. चोरट्यांनी शाहुपूरी येथून व्हॅन चोरुन तिचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देगुजरी सराफ दूकानातील तिजोरी मिरजेत सापडली, पुणे-पिंपरी येथील चोरट्यांचा समावेशशाहुपूरीतील चोरीच्या व्हॅनचा वापर

कोल्हापूर : महाव्दार रोड व गुजरी परिसरात दोन सराफ दुकाने फोडून चोरट्यांनी २२ लाख किंमतीचे ६० तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. यावेळी प्रमोद कोलेकर यांच्या दुकानातून लंपास केलेली तिजोरी मिरज फाटा येथे रस्त्याकडेला रिकाम्या अवस्थेत पोलीसांना मिळून आली. चोरट्यांनी शाहुपूरी येथून व्हॅन चोरुन तिचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.गुजरीतील दरोड्याचा तपास करताना तिघे चोरटे व्हॅनमधून आल्याचे रोडवरील एका दूकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. कोलेकर सराफ यांच्या दूकानातील दागिन्यांची तिजोरी चोरट्यांनी लंपास केली होती. तिजोरीत सुमारे १८ लाख किंमतीचे दागिने होते. व्हॅनचा शोध घेतला असता चोरट्यांनी शाहूपुरी येथील एका घरासमोरुन चोरी करुन ते गुजरीत आले.

तेथून ते स्टेशन रोडने सांगली फाटा येथून मिरजेकडे गेल्याचे दिसून आले. त्यानुसार शोध घेतला असता मिरज फाटा येथे रिकामी तिजोरी पोलीसांना मिळून आली. महार्गाच्या दिशेने चोरटे निघून गेल्याने ते पुणे-पिंपरी येथील असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. या परिसरातील रेकॉर्डवरील चोरट्यांची पोलीस माहिती घेत आहेत.दोन्ही दरोड्यांची मोडस एकचगुजरी दरोड्यातील चोरट्यांनी मिरज फाटा येथे तिजोरी टाकून पुण्याला पलायन केल्याची शक्यता आहे. कळे दरोड्यातील टोळीने वैभववाडी मार्गे गोव्याकडे पलायन केल्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही दरोड्यांची मोडस एकच असल्याने दोन टोळ्या एकत्रित कार्यरत असण्याची संशय पोलीसांना आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या टोळीच्या मार्गावर आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर