शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागर यांचे शक्तिप्रदर्शन; अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:46 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत सोमवारी ६१ उमेदवारांनी ८६ अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यात १० जागांसाठी १३६ अर्ज ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत सोमवारी ६१ उमेदवारांनी ८६ अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यात १० जागांसाठी १३६ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीच्या डाॅ. नंदाताई बाभूळकर, मानसिंग खोराटे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, किमान पाच मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी अटळ असून त्याचा फैसला सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर) होणार आहे.चंदगडमध्ये काँग्रेसचे गोपाळराव पाटील आणि अप्पी ऊर्फ श्रीशैल पाटील यांनी अर्ज दाखल केले असून, यातील एकजण रिंगणात राहणार आहे. हा बाभूळकर यांच्यासाठी धक्का आहे. खोराटे यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. भाजपचे शिवाजीराव पाटील यांचा बंडखोरीचा निर्णय कायम आहे. राधानगरीमध्ये अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.कोल्हापूर उत्तरमधून वैशाली राजेश क्षीरसागर यांनीही अर्ज दाखल केला असून भाजपचे अजित ठाणेकर यांनी भरलेला अपक्ष अर्ज चर्चेचा विषय ठरला. शाहूवाडी मतदारसंघातून सत्यजित पाटील यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनीही अर्ज दाखल केला असून हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनीही सोमवारी अर्ज दाखल केले. इचलकरंजीमधून माजी आमदार अशोक जांभळे यांचे चिरंजीव सुहास यांनीही अर्ज दाखल केला असून, शिरोळमधून शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह स्वरूपा राजेंद्र यड्रावकर यांनी अर्ज दाखल केला.चंदगड

  • गोपाळराव मारुतराव पाटील, अपक्ष
  • नंदिनी बाभूळकर कुपेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
  • आण्णासाहेब ऊर्फ श्रीशैल विनायक पाटील, अपक्ष
  • शिवाजी शातुप्पा पाटील, अपक्ष
  • अप्पी ऊर्फ विनायक गोविंदराव पाटील, अपक्ष
  • मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
  • सुश्मिता राजेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
  • राजेश नरसिंगराव पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
  • नंदिनी बाभूळकर कुपेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
  • आकाश एकनाथ डवरी, अपक्ष
  • मनीषा मानसिंग खोराटे, अपक्ष
  • मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
  • मानसिंग गणपती खोराटे, अपक्ष
  • श्रीकांत अर्जुन कांबळे, बहुजन समाज पक्ष

राधानगरी

  • प्रकाश आनंदराव आबिटकर शिंदेसेना
  • रणजितसिंग कृष्णराव पाटील, अपक्ष
  • राजेंद्र यशवंत ऊर्फ आर. वाय. पाटील, अपक्ष
  • आनंदराव यशवंत ऊर्फ ए. वाय. पाटील, अपक्ष

कागल

  • अजित भारत निकम, अपक्ष
  • अश्विन अर्जुन भुजंग, अपक्ष
  • हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष
  • नावीद हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष

कोल्हापूर दक्षिण

  • प्रकाश बापू शेळके, अपक्ष
  • सलीम नूरमहम्मद बागवान, अपक्ष
  • सुप्रिया प्रकाश लाखे, अपक्ष
  • विशाल केरू सरगर, अपक्ष
  • सुरेश सायबू आठवले, बहुजन समाज पक्ष
  • जयश्री विलास बनसोडे, अपक्ष
  • विश्वास रामचंद्र तरटे, रिपब्लिकन पक्ष (ए)

करवीर

  • विष्णू पांडुरंग गायकवाड, अपक्ष
  • माणिक बाबू शिंदे, अपक्ष
  • कृष्णाबाई दीपक चौगुले, अपक्ष

कोल्हापूर उत्तर

  • अजित सुलभा दत्तात्रय ठाणेदार, भारतीय जनता पक्ष
  • चंद्रशेखर श्रीराम म्हस्के, अपक्ष
  • अरविंद्र भिवा माने, अपक्ष
  • राजेश विनायक क्षीरसागर, शिंदेसेना
  • रूपा प्रवीण वायदंडे, रिपब्लिकन पक्ष इंडिया (अ.)
  • वैशाली राजेश क्षीरसागर, अपक्ष

शाहूवाडी

  • संतोष केरबा खोत, कामगार किसान पक्ष
  • बाबासो यशवंतराव पाटील, अपक्ष
  • सत्यजित विलासराव पाटील, अपक्ष
  • आनंदराव वसंतराव सरनाईक, संभाजी ब्रिगेड पक्ष
  • आनंदराव वसंतराव सरनाईक, अपक्ष
  • विनय विजय चव्हाण, अपक्ष
  • विनय विष्णू कोरगावकर, अपक्ष
  • विनय विलास कोरे, जनसुराज्य शक्ती पक्ष

हातकणंगले

  • प्रदीप भीमसेन कांबळे, अपक्ष
  • गणेश विलास वायकर, रिपब्लिकन पक्ष (A)
  • वैभव शंकर कांबळे, अपक्ष
  • इंद्रजित आप्पासाहेब कांबळे, अपक्ष
  • सुजित वसंतराव मिणचेकर, अपक्ष
  • अशोकराव कोंडीराम माने, जनसुराज्य शक्ती पक्ष

इचलकरंजी

  • सचिन किरण बेलेकर, राष्ट्रीय समाज पक्ष
  • अभिषेक आदगोंडा पाटील, अपक्ष
  • आरती रमेश माने, अपक्ष
  • सुहास अशोकराव जांभळे, अपक्ष
  • राहुल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पक्ष
  • रवी विठ्ठल पाटोळे, अपक्ष

शिरोळ

  • आदम बाबू मुजावर, अपक्ष
  • स्वरूपा राजेंद्र पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी
  • विश्वजीत पांडुरंग कांबळे, रिपब्लिकन सेना
  • शीला श्रीकांत हेगडे, अपक्ष
  • उल्हास संभाजी पाटील, अपक्ष
  • आरिफ महमदअली पटेल, वंचित बहुजन आघाडी
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलradhanagari-acराधानगरीHasan Mushrifहसन मुश्रीफRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरPrakash abitkarप्रकाश आबिटकरMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024