शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली अभयारण्यग्रस्तांना चार कोटींचे अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:28 IST

सलग पंचेचाळीस दिवस अभयण्यग्रस्तांनी जिल्हा वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते

आंबा: चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या घर बांधणी अनुदानासाठी चार कोटी दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. सलग पंचेचाळीस दिवस अभयण्यग्रस्तांनी जिल्हा वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यातील आश्वासनानुसार प्रस्तावित घर अनुदानापोटी सदर निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध रक्कम सर्व अभयण्यग्रस्तांना पुरेल इतकी नसल्याने पात्र कुटुंबाला अनुदान मिळावे म्हणून संघटनेच्या स्तरावर प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना रु. ५१४०० वाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे ती रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम वन प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती संघटक जगन्नाथ कुडतुडकर यांनी दिली.नऊशे सतरा खातेदारांना दीड लाख रुपयांप्रमाणे चौदा कोटी रुपये निधीची गरज आहे. पण, प्रत्यक्षात साडेचार कोटींपर्यंत निधी उपलब्ध झाल्याचे राज्य सचिव मारुती पाटील यांनी स्पष्ट केले. वारूळ पैकी गोठणे येथील वसाहतीमधील अभयरण्यग्रस्तांना सहा हेक्टर ४४ आर शेतजमिनीचे आठवड्यात वाटप करण्याची वन प्रशासनाने ग्वाही दिली होती. पण, महिना झाला तरी शेतजमीन वाटपाचे एक पाऊलही पुढे पडले नसल्याचे गोठणे येथील अभयण्यग्रस्त धोंडीबा पोवार यांनी खंत मांडली. ९१७ खातेदारांपैकी सुमारे तीस टक्के खातेदारांची संकलन दुरुस्ती प्रलंबित आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली