'आता जर घरी थांबाल तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला येऊ शकाल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:07 IST2020-04-18T18:01:14+5:302020-04-18T18:07:11+5:30

त्यातून एक सामाजिक संदेश दिला आहे. ज्यामध्ये ‘आता जर घरी थांबाल तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला येऊ शकाल,’ असे लिहिले आहे.

Grandson's Bar online with social messaging | 'आता जर घरी थांबाल तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला येऊ शकाल'

कोल्हापुरातील मनीषानगरमधील पंडितराज कर्णिक यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नातवाचे बारसे केले.

ठळक मुद्देसामाजिक संदेश देऊन आॅनलाईन पद्धतीने नातवाचे बारसे

कोल्हापूर : लॉकडाऊन असल्यामुळे सामाजिक संदेश देऊन मनीषानगर येथील पंडितराज कर्णिक यांनी फेसबुक लाइव्हद्वारे आपल्या नातवाचे बारसे साजरे केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. यामुळे लोकांना घरातील अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या नातवाचे बारसे साजरे करण्यासाठी पंडितराज कर्णिक आणि परिवार यांनी आॅनलाईन पद्धतीचा वापर करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मुलासोबत फेसबुक लाइव्ह करून हा कार्यक्रम पार पाडला.

त्यातून एक सामाजिक संदेश दिला आहे. ज्यामध्ये ‘आता जर घरी थांबाल तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला येऊ शकाल,’ असे लिहिले आहे. या कार्यक्रमामध्ये मुलाची आई माधुरी कुंभार, वडील अमोल कुंभार तसेच मंदाकिनी कर्णिक, मोहिनी कर्णिक, मयूर कर्णिक, अपूर्वा इंदुलकर उपस्थित होते.
 

Web Title: Grandson's Bar online with social messaging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.