शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
4
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
5
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
6
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
7
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
8
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
9
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
10
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
11
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
12
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
13
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
14
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
15
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
16
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
17
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
20
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं

Kolhapur: आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांच्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 18:22 IST

'बाळूमामांच्या नावानं चांगभलं 'चा जयघोष, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण

बाजीराव जठार वाघापूर : महाराष्ट्र-कर्नाटकासह,आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातील लाखो  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेसाठी हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांच्या रथोत्सवाचे आगमन झाले. बाळूमामांच्या १९ बग्ग्यातून (बकर्यांचे कळप) महाप्रसादाकरिता आणलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामांच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक व भक्तीमय वातावरणात पार पडला.'बाळूमामांच्या नावानं चांगभलं 'चा जयघोष करत, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण, ढोलकैताळाच्या गगनवेधी आवाजात राधानगरी- निपाणी मार्गावर निढोरी, आदमापूर मार्गावर रथोत्सव सुमारे ४ तास चालला. बाळूमामा देवालयाचे मानकरी कर्णसिंह धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली.भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरीत एकत्र आल्या. या बगीच्या घागरींचे भाविक ग्रामस्थ, महिलांनी औक्षण करून स्वागत केले.तब्बल चार तास चाललेल्या या रथोत्सवात भाविक भक्तीरसात तल्लीन झाले होते.ढोल कैताळाच्या  आवाजात धनगरी बांधव दंग झाले होते .हलगी घुमक्याच्या ठेक्यावर अश्व देखील नाचत होते.भंडा-याच्या मुक्त हस्ते उधळीत बाळूमामांच्या नावानं चांगभल ऽऽऽऽअशा जयघोषात परिसर दुमदुमला होता. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगी- बेरंगी फुलांची पखरण, कीर्तन प्रवचन बरोबर टाळ-मृदंगाचा गजर, ढोल- ताशाचा दणदणाट, भंडाऱ्यांची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं!'चा जयघोष चालू होता.राजस्थान व मध्यप्रदेश मधील धनगर बांधवांनी सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळूमामांची १३८किलो चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती .रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक सुरक्षित व शांततेत पार पाडणेसाठी पोलीस,होमगार्ड ,सेवेकरी यांचे योगदान मोठे होते. बाळूमामा भक्त भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत वाटत होते.  या मिरवणुकीमध्ये धैर्यशील भोसले, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, विजय गुरव, प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुधाच्या घागरी नेण्याची प्रथा ...महाराष्ट्र- कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरच्या संत सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा उत्सवास निढोरी येथून रथातून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली आहे. भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं