शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत दादांची पाटीलकी गेली; जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 5:35 AM

आ. पाटील यांचे गावात कमी वास्तव्य असले तरी चांगला संपर्क आहे. मागील वेळी नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले होते.

कोल्हापूर/सांगली/सातारा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तिथे शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गटाला नऊपैकी दोन जागांवर समाधान मानावे लागले.कोल्हापूर- गारगोटी रस्त्यावर गारगोटीच्या अलीकडे एक किलोमीटरवर हे सुमारे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव आहे. याठिकाणी एकूण तीन हजार मतदार आहेत. येथील नऊ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचा स्थानिक गट एकत्र आला होता. अखेर निवडणूक निकालानंतर शिवसेनेला सहा, भाजप दोन, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. आ. पाटील यांचे गावात कमी वास्तव्य असले तरी चांगला संपर्क आहे. मागील वेळी नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले होते.

जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले...सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची सत्ता उलथवून लावत, चुलत मेहुणे तथा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी बाजी मारली.म्हैसाळमध्ये १७ पैकी भाजपला तब्बल १५, तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर विजय मिळाला. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपने येथे सत्ता खेचून आणली असून, सासुरवाडीतील राष्ट्रवादीचा पराभव हा जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. येथे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीत जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढविल्या जात असल्या, तरी जयंत पाटील यांच्या नातेवाइकांचा हा पराभव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्कासातारा - कऱ्हाड दक्षिण मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. मोठ्या ग्रामपंचायती भाजपने अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकल्या आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कऱ्हाड उत्तर मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मंत्री शंभुराजे देसाई यांनी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchandrakant patilचंद्रकांत पाटीलJayant Patilजयंत पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण