पानसरे हत्या प्रकरण: गोळ्या झाडणारे कोण? तपास यंत्रणेलाच सांगता येत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 13:55 IST2022-03-16T13:54:26+5:302022-03-16T13:55:51+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे ते दोघे कोण आहेत, हेच सरकारी तपास यंत्रणेला सांगता येत नसल्याने आरोप निश्चितीपूर्वी त्याचा विचार करावा, अशी बाजू संशयित आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सुनावणीत मांडली.

पानसरे हत्या प्रकरण: गोळ्या झाडणारे कोण? तपास यंत्रणेलाच सांगता येत नाही
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या करणारे ते दोघे कोण आहेत, हेच सरकारी तपास यंत्रणेला सांगता येत नसल्याने आरोप निश्चितीपूर्वी त्याचा विचार करावा, अशी बाजू संशयित आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सुनावणीत मांडली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
संशयित समीर गायकवाडचा डिस्चार्ज अर्ज ॲड. समीर पटवर्धन यांनी मागे घेतला. विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. शिवाजीराव राणे काम पाहात आहेत. पुढील सुनावणी २५ मार्चला आहे.
युक्तिवादानंतर ॲड. इचलकरंजीकर म्हणाले, पानसरे दाम्पत्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक समीर गायकवाड होता. अटकेनंतर तो २२ महिने कारागृहात राहिला. वर्षानंतर तपासात गोळीबारासाठी आलेले दोघे हे सारंग अकोळकर व विनय पवार होते. त्यानंतर दाखल आरोपपत्रात सचिन अंदुरे व वासुदेव सूर्यवंशीचा संदर्भ आला. साक्षीदाराचे पोलीस मान्य करतात. त्यामुळे नेमके दोघे कोण? हे आरोप निश्चित कसे करणार? हेच युक्तिवादात मांडल्याचे ॲड. इचलकरंजीकर म्हणाले.
ॲड. पटवर्धन म्हणाले, तीन वेगवेगळ्या तपासामुळे ‘एसआयटी’च्या तपासात तफावत दिसते. त्यामुळे समीर गायकवाडचा डिस्चार्ज अर्ज मागे घेतला आहे.