शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

नेतेमंडळी घेणार आता सत्ताधारी संचालकांची हजेरी

By admin | Updated: July 17, 2015 01:07 IST

पुढील कारभार चांगला व पारदर्शी करण्यासाठी तसेच शेतकरीभिमुख निर्णय होण्यासाठी आघाडीचे नेते संचालक मंडळाला सोबत घेऊन आढावा घेणार

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर विजयाचा झेंडा फडकाविणाऱ्या राष्ट्रवादी-जनसुराज्य-शेकाप आघाडीच्या नेत्यांनी समितीचा कारभार चांगला राहण्यासाठी दोन महिन्यांतून एकदा संचालकांसमवेत बैठक घेऊन आढावा घेण्याचे नियोजन केले आहे. सभापतिपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी आघाडीचे नेते एकत्र बसून सर्वसंमतीनेच निर्णय घेणार आहेत यासंदर्भात लवकरच बैठक होईल.बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी-जनसुराज्य शक्ती-शेकापक्षाची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी, काँग्रेसची राजर्षी शाहू आघाडी व शिवसेना-भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिव-शाहू परिवर्तन आघाडी उतरली होती. तीन पक्षीय पॅनेलमुळे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. विरोधकांकडून राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळेच प्रशासक आणण्याची वेळ आल्याचीही टीका झाली. या आरोपानंतरही राष्ट्रवादीने १९ पैकी १५ जागा जिंकत मैदान मारले तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांची सल राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना अजूनही बोचत आहे.त्यामुळे त्यामुळे इथून पुढील कारभार चांगला व पारदर्शी करण्यासाठी तसेच शेतकरीभिमुख निर्णय होण्यासाठी आघाडीचे नेते संचालक मंडळाला सोबत घेऊन आढावा घेणार आहेत. दर दोन महिन्याला ही बैठक घेतली जाईल. बाजार समिती सभापतिपद कोणाकडे यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती, शेकापक्ष, माजी मंत्री सतेज पाटील गट, समरजितसिंह घाटगे गट यांचे नेते एकत्र बसून सर्वानुमते व सर्वसंमतीने निर्णय घेणार आहेत. लवकरच याबाबत बैठक होऊन निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. (प्रतिनिधी)