शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

सरकारचा ‘बालसंगोपन’ योजनेला खो-अडीच वर्षे पैचे वाटप नाही । कोल्हापुरात होते सहाशे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:04 AM

अनाथ, निराधार मुलांसाठी कोणतीही निवासी संस्था ही कुटुंबाला पर्याय ठरू शकत नाही म्हणून मुलांचे संगोपन संस्थामध्ये होण्याऐवजी ते आईवडिलांच्या मायेच्या छत्राखालीच व्हावे या चांगल्या हेतूने सुरू झालेली बालसंगोपन योजना जवळपास बंदच पडली आहे. राज्यात या योजनेचे सुमारे १८ हजार लाभार्थी होते;

ठळक मुद्देअठरा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना दरमहा ४२५ रुपये याप्रमाणे हे अनुदान दिले जात होते.बालकल्याण संकुल संस्थेमार्फत ५० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता.

संडे अँकर ।   विश्वास पाटील ।कोल्हापूर : अनाथ, निराधार मुलांसाठी कोणतीही निवासी संस्था ही कुटुंबाला पर्याय ठरू शकत नाही म्हणून मुलांचे संगोपन संस्थामध्ये होण्याऐवजी ते आईवडिलांच्या मायेच्या छत्राखालीच व्हावे या चांगल्या हेतूने सुरू झालेली बालसंगोपन योजना जवळपास बंदच पडली आहे. राज्यात या योजनेचे सुमारे १८ हजार लाभार्थी होते; परंतु २०१६ पासून आपल्या कल्याणकारी मायबाप सरकारने या योजनेतून दिले जाणारे अनुदान बंद केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचे ६०० लाभार्थी होते. अठरा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना दरमहा ४२५ रुपये याप्रमाणे हे अनुदान दिले जात होते.

संयुक्त राष्ट्रसंघाची बालहक्क संहिता स्वीकारल्याने समाजातील सर्व बालकांना त्यांच्यासाठीचे हक्क मिळालेच पाहिजेत हे धोरण बंधनकारक आहे. तरीही बालकांच्या हक्कांची, प्राथमिक जबाबदारी ही त्या बालकाच्या जन्मदात्या, दत्तक किंवा फॉस्टर पालकांची असते. कोणत्याही बालकाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक वाढ नैसर्गिकपणे कुटुंबामध्येच होत असते. या तत्त्वाला धक्का न लावता शासनाने पालकत्व स्वीकारणे अपेक्षित आहे. त्याचाच भाग म्हणून ही योजना राबविण्यात येत होती. त्याचा बालकांच्या संगोपनासाठी पालकांना हातभार लागत असे. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून या योजनेचे अनुदानच सरकारने बंद केले आहे. मुळात या योजनेचा लाभ मिळवण्यास अर्ज करताना लाभार्थी बालकांच्या पालकांना वारेमाप खर्च करावा लागतो आणि अर्ज मात्र बालकल्याण कार्यालयात थप्पीला धूळ खात पडतात. सध्या जिल्हा कार्यालयाकडून नवीन अर्ज स्वीकारणेच बंद केले आहे. येथील आभास फाऊंडेशनने २०१२ मध्ये या योजनेतील गैरव्यवहारही उघडकीस आणले होते. येथील बालकल्याण संकुल संस्थेमार्फत ५० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. परंतु त्यांनाही हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत.यांना होता मोठा आधार...एक पालक असलेली व कौटुंबिक संघर्षात असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, आदी कारणांमुळे विघटित कुटुंबांतील बालकांना योजनेचा मोठा आधार होता. रक्कम कमी होती; परंतु शैक्षणिक व वैद्यकीय खर्चासाठी तिची अल्पशी मदत होत असे. 

बालसंगोपनात उपयुक्त ठरणारी ही योजना सरकारने का बंद केली हेच समजत नाही. योजनेचे सरकारने सामाजिक लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. बालगृहे म्हणजेच संस्थाधारित पुनर्वसन आणि बालसंगोपन योजनेसारख्या संस्थाबाह्य सुविधा यांचा अभ्यास होण्याची गरज आहे.- अतुल देसाई, बालकल्याणक्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना