शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आधी स्मशानभूमीचे काम, मगच इतर विकासकामांना दाम; ‘लोकमत’च्या चळवळीला ग्रामविकास विभागाचे पाठबळ

By समीर देशपांडे | Updated: March 4, 2026 16:46 IST

याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देणेही बंधनकारक

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यभरातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा सुरू ठेवल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने या विषयाला पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे. ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही, अशा गावांतील अन्य विकासकामांपेक्षा आधी स्मशानभूमीचे काम प्राधान्याने हाती घेण्याचा शासन आदेश काढण्यात आला असून, याबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीला हा आदेश काढण्यात आला आहे.गतवर्षी ‘लोकमत’ने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर स्मशानभूमी नसल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सखोल सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. इतकेच नव्हे, तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून स्मशानभूमींसाठी गायरानातील जागा उपलब्ध करण्याबाबतही चर्चा करून त्यापुढील कार्यवाही सुरू केली.याचदरम्यान विधिमंडळाच्या गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यातील सर्वच गावांचे सर्वेक्षण करण्याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घोषणा केली होती. ज्या गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. अशा गावांमध्ये लोकप्रतिनिधींना गावांतर्गत मूलभूत सुविधांची कामे मंजूर करीत असताना, स्मशानभूमी व स्मशानभूमीविषयक अनुषंगिक कामांना प्राधान्य देण्यात येईल, असेही सभागृहात स्पष्ट केले होते. त्याला अनुसरूनच आता ग्रामविकास विभागाने हा आदेश काढला आहे.

स्मशानभूमी नसेल तर...एखाद्या गावातील विकासकामांचा प्रस्ताव यापुढे सादर करताना त्या गावात स्मशानभूमी आहे किंवा नाही याचे स्पष्ट प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. जर स्मशानभूमी नसेल तर प्राधान्याने तेथे स्म्शाानभूमी, शेड बांधकाम, संरक्षक भिंत, जाण्यासाठी रस्ता, वृक्षलागवड, सुशोभीकरण हीच कामे घ्यावी लागणार आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेची ‘सुखांत’ योजनाकोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १५० हून अधिक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या पुढाकारातून ‘सुखांत’ योजना निश्चित करण्यात आली. त्यानुसार आता ८८ ठिकाणी स्मशानभूमींसाठी गायरानातील जागा उपलब्ध होणार असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crematoriums First: Development Follows; 'Lokmat' Initiative Supported by Rural Development.

Web Summary : Following Lokmat's campaign, Maharashtra prioritizes crematorium construction in villages lacking them. Gram panchayats must now certify crematorium availability before other development projects proceed. Kolhapur is pioneering a scheme to allocate land for crematoriums.