शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय यंत्रणांनी विमा कवच नाकारले; १६ आठवड्यात लाभ देण्याचे कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:51 IST

कोविडने दगावलेल्या परिचारिकेच्या नातेवाईकांना ५० लाखांचे विमा कवच मंजूर

कोल्हापूर : कोरोना काळात सांगली पोलिस रुग्णालयात रुग्णांची सुश्रूषा करताना कोविडने दगावलेल्या परिचारिकेस शासकीय यंत्रणांनी विमा सुरक्षा कवच नाकारले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचने याबाबत सरकारी यंत्रणांना फटकारले. मृत परिचारिका रेखा सुनील मोहिते (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांच्या नातेवाईकांना ५० लाखांचे विमा कवच मंजूर केले.सांगली पोलिस रुग्णालयात काम करताना परिचारिका रेखा मोहिते यांना २१ एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. चारच दिवसांत २४ फेब्रुवारीस उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोविड महामारीत शासकीय यंत्रणांनी सांगली पोलिस रुग्णालय अधिग्रहित केले नसल्याने परिचारिका मोहिते यांना विमा सुरक्षा कवच नाकारण्यात आले. याबाबत मृत मोहिते यांचे पती सुनील मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ॲड. धैर्यशील सुतार यांनी मोहिते यांची बाजू मांडली. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यातून मोहिते यांना वगळल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याचे ॲड. सुतार यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले.न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या डिव्हिजन बेंचने याची गंभीर दखल घेऊन शासकीय यंत्रणांना फटकारत परिचारिका मोहिते यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच मंजूर केले. तसेच १६ आठवड्यांत विमा रकमेचा लाभ देण्याचा आदेश दिला. ॲड. सुतार यांनी याप्रकरणी भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, राज्याचे आरोग्य संचालक, सहसंचालक, कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक, सांगलीचे क्षयरोग अधिकारी आणि मुंबईतील विमा कंपनीला प्रतिवादी केले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Court orders insurance for nurse denied coverage after COVID death.

Web Summary : Kolhapur court orders ₹50 lakh insurance for nurse Rekha Mohite, denied coverage after dying from COVID while serving at a Sangli hospital. The court reprimanded authorities and mandated payment within 16 weeks, acknowledging injustice to her family.