शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

गुड टच आणि बॅड टच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:57 AM

सध्या समाज माध्यमांमध्ये गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, हे सांगणाऱ्या ध्वनिचित्रफिती फिरत आहेत. ज्या लहान मुलांना एखाद्या व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखावा हे शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. देशभरात बलात्काराच्या विशेषत: बालिकांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या कथुआ, उन्नाव आणि सुरत ...

सध्या समाज माध्यमांमध्ये गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, हे सांगणाऱ्या ध्वनिचित्रफिती फिरत आहेत. ज्या लहान मुलांना एखाद्या व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखावा हे शिकविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला कारणही तसेच आहे. देशभरात बलात्काराच्या विशेषत: बालिकांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या कथुआ, उन्नाव आणि सुरत येथील बालिकांवरील बलात्काराच्या घटना तर कुणाचेही मन पेटून उठविणाºया आहेत. चीड आणणाºया आहेत. अजाण बालिका ज्यांनी जगही नीट पाहिलेले नसते. चांगले, वाईट हे कळण्याजोगे त्यांचे वयही नसते. अशा मुलींवर बलात्कार करणारे विकृतच असले पाहिजेत. बलात्काराच्या या घटनांमुळे देशभर जनक्षोभ उसळला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही एका याचिकेवरील सुनावणीच्यावेळी देशाची प्रतिमा बलात्काराची होत असल्याची टिप्पणी केली आहे. वाढता जनक्षोभ आणि न्यायालयाचे मत पाहून मोदी सरकारने अखेर कायदा कठोर करण्याचा निर्णय घेऊन तसा अध्यादेशही जारी केला आहे. सुधारित पॉस्को कायद्यानुसार आता १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला फाशी, १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाºयाला आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा आणि महिलेवरील बलात्कारप्रकरणी होणारी शिक्षा ७ ऐवजी १० वर्षांचा कारावास अशी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बलात्काराची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविली जाणार आहेत. तसेच ती दोन महिन्यांत निकालात काढली जाणार आहेत. कायद्यातील या सुधारणांमुळे लैंगिक अत्याचार करणाºयांना जरब बसेल आणि अशा घटना कमी होतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. तशी ती आपण निर्भया प्रकरणानंतर करण्यात आलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को) करण्यात आला त्यावेळीही बाळगलीच होती. हा कायदा झाल्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. फाशीच्या शिक्षाही काही प्रकरणात न्यायालयांनी ठोठावल्या. हे खरे असले तरी यामुळे बलात्काराच्या घटना कमी झाल्याचे काही दिसले नाही. २०१४ मध्ये ३४ हजार ४४९ बलात्काराची प्रकरणे पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी ४१ हजार ४७२ जणांना अटक करण्यात आली, तर बलात्कारप्रकरणी २६८६ जण दोषी ठरले. २०१५ मध्ये हाच आकडा ३४ हजार ५०५ गुन्हे, ४१ हजार ९० जणांना अटक आणि ४५६७ जण दोषी असा होता. २०१६ मध्ये तो ३६ हजार २२ गुन्हे, ४२ हजार १६० जणांना अटक आणि ४०१३ जण दोषी असा होता. पोलिसांपर्यंत न गेलेली प्रकरणेही अनेक असतील. इस्लामी राष्टÑात बलात्काºयाला दगडाने ठेचून मारण्याची, शिरच्छेद करण्याची शिक्षा ठोठावली जाते. अशा शिक्षांची अंमलबजावणी केली जात असतानाच्या काही व्हिडिओ क्लिपही गेल्या काही दिवसांत व्हायरल झाल्या आहेत. त्या पाहिल्यानंतर असे गुन्हे करण्यास कोणीही धजावणार नाही असे वाटते. मात्र, आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे तशा पद्धतीची शिक्षा अमलात आणली जाईल असे वाटत नाही. तरीही असलेल्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढले तरी गुन्हेगारांना जरब बसू शकेल. याचवेळी सुजाण पालक म्हणून आपण आपल्या लहान मुलींना चांगले, वाईट स्पर्श ओळखण्यास शिकविले पाहिजे. अशा गोष्टी लहान मुलांसमोर बोलल्या जात नाहीत. तशी आपली मानसिकता नाही हे खरे असले तरी ती बदलायला हवी. व्हायरल होणाºया ध्वनिचित्रफितीत बॅड टच म्हणजे काय हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरेतर महिलांमध्ये पुरुषी स्पर्श आणि नजर ओळखण्याची एक उपजत क्षमता असते असे म्हणतात. त्यामुळे त्या वेळीच सावध होतात; पण लहान मुलींना योग्य शिक्षण देणे आणि गुन्हेगारांना कठोर शासन देणे हाच यावरचा जालीम उपाय ठरू शकेल .चंद्रकांत कित्तुरे