शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Dhananjay Mahadik: महाडिकांना संपवण्याची भाषा सोडा :  धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:03 AM

Dhananjay Mahadik GokulMilk Election Kolhapur : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा लढाईचा भाग आहे.लढाई करायचीच असेल तर तत्त्वांची करावी.महाडिकांना संपवण्याची भाषा सोडून द्यावी,या शब्दांत माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

ठळक मुद्दे कानडेवाडीत मेळावा, महाडिकांना संपवण्याची भाषा सोडा :  धनंजय महाडिक शिवसेनेच्या बाळासाहेब,संग्राम कुपेकरांचा सत्तारुढ आघाडीला पाठिंबा

नेसरी  : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा लढाईचा भाग आहे.लढाई करायचीच असेल तर तत्त्वांची करावी.महाडिकांना संपवण्याची भाषा सोडून द्यावी,या शब्दांत माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नामोल्लेख टाळून पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू पाटील होते.माजी आमदार महादेवराव महाडिक व संजय घाटगे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भैय्या कुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिवसेनेचे संग्राम कुपेकर व बाळ कुपेकर यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.महाडिक म्हणाले, 'गोकुळ'हा दूध उत्पादकांना ८२ टक्के परतावा देणारा आशिया खंडातील एकमेव संघ आहे. साडेपाच लाख दूध उत्पादकांना ह्यगोकुळह्णचा आधार आहे. भरमू पाटील म्हणाले, गोकुळची धुरा महाडिक व पी. एन. पाटील यांनी समर्थपणे सांभाळली आहे. बाळ कुपेकर म्हणाले, अखेरपर्यंत आपल्याला झुलवत ठेवून विरोधी आघाडीने आपल्यावर अन्याय केला. म्हणूनच सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, बी. एम. पाटील-वाघराळीकर, कृष्णराव वार्इंगडे, तानाजी पाटील, भरमाण्णा गावडा यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास उमेदवार सदानंद हत्तरकी, सम्राट महाडिक, रणजीतसिंह पाटील-मुरगुडकर, वसंत नंदनवाडे आदी उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर