शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

Kolhapur: डिबेंचरवरून आरोप-प्रत्यारोप, ‘गोकुळ’ दूध संघ गेली ३२ वर्षांपासून करतय कपात; डिबेंचर म्हणजे काय?.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: October 13, 2025 19:17 IST

बिन परतीच्या ठेवीवर इमारती उभारल्या

राजाराम लोंढेकोल्हापूर : सध्या ज्या डिबेंचरवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ही डिबेंचर रक्कम ‘गोकुळ’ दूध संघ गेली ३२ वर्षे कपात करत आहे. प्रत्येक वर्षी त्यावरील व्याज संस्थांना परत दिले जाते. विशेष म्हणजे ‘गोकुळ’ व दूध संस्थांच्या पातळीवर या रकमेचा मार्च २०२५ मध्येच जमा-खर्च झालेला असल्याने यात पाठीमागे येणे शक्य नसल्याचेही स्पष्ट होत आहे.प्राथमिक दूध संस्था सक्षम व्हाव्यात म्हणून १९९२-९३ पासून ‘गोकुळ’ने नफ्यातील शिल्लक रक्कम डिबेंचर म्हणून संस्थांच्या नावे टाकण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष अरुण नरके, स्व. आनंदराव पाटील-चुयेकर, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह तत्कालीन संचालकांनी घेतला. नफा किती शिल्लक राहतो, त्यावर ही रक्कम निश्चित केली होती. यंदा संघाला नफा चांगला झाल्याने सर्व तरतुदी करून ७२ कोटी शिल्लक रक्कम डिबेंचरच्या रूपाने संस्थांच्या नावे वर्ग करण्यात आली.वास्तविक, म्हैस दुधाला प्रतिलिटर २.४५ रुपये तर गाय दुधाला १.४५ रुपये दूध दर फरक, डिबेंचर व्याज, दूध दर फरकावरील व्याज व लाभांश ही रक्कम संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. मात्र, डिबेंचरपोटी कपात केलेली रक्कम परत करण्याची मागणी यंदाच संस्थांकडून सुरू झाल्याने हा गुंता वाढला आहे.डिबेंचर म्हणजे काय?‘गोकुळ’ने दूध दर फरकासह इतर तरतुदी करून शिल्लक राहिलेला नफा संस्थांना डिबेंचर (कर्जरोखे) म्हणून दिला जातो. दूध संस्थांचे पैसे संघाकडे शिल्लक राहिले तरी वर्षाला त्यावर व्याज दिले जाते.बिन परतीच्या ठेवीवर इमारती उभारल्यापूर्वी ‘गोकुळ’ संघ दूध संस्थांकडून बिन परतीच्या ठेवी घेत होता. मात्र, १९९२ मध्ये त्या संस्थांना परत केल्या आणि त्यावर बहुतांशी संस्थांच्या इमारती उभारल्या. त्यानंतर ठेवी स्वीकारण्याऐवजी डिबेंचर कपात सुरू झाली.

‘गोकुळ’ने आतापर्यंत कधीच डिबेंचर रक्कम संस्थांना परत केलेली नाही. त्यावर व्याज वर्षाला संस्थांच्या खात्यावर वर्ग होते. दूध संस्थांच्या सक्षमीकरणासाठी संघाने केलेली ही तरतूद आहे. - के. डी. पाटील (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटना)‘गोकुळ’ला नफा जास्त झाल्यानंतर त्या पैशाचे करायचे काय? याबाबत १९९२ ला ‘एनडीडीबी’चे प्रमुख डॉ. वर्गीस कुरियन व अमृता पटेल यांच्याकडे संघाने सल्ला मागितला. त्यांनी काही रक्कम शेअर्स म्हणून तर काही डिबेंचर म्हणून घ्या, यातून दूध संस्था सक्षम होण्यास मदत होईल, असा सल्ला दिला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. - अरुण नरके (माजी अध्यक्ष, गोकुळ)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Gokul Dairy's Debenture System Sparks Controversy After 32 Years

Web Summary : Gokul Dairy's debenture system, in place for 32 years, is now facing opposition. Started in 1992-93 to empower milk cooperatives, the system involves allocating a portion of Gokul's profits as debentures to these institutions, with annual interest paid. Demands for repayment of debentures are increasing, causing complications.