शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ चीज, आईस्क्रीम तयार करणार; संचालक मंडळाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:33 IST

‘मुऱ्हा’प्रमाणेच ‘पंढरपुरी’ म्हशीला अनुदान द्या

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ परराज्यांतील जातीवंत म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर पंढरपुरी म्हशीलाही द्या, अशी मागणी संघाच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.‘गोकुळ’ने यापूर्वी आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पावसाळ्यानंतर केली जाणार आहे. बाजारात चीजला खूप मागणी आहे, ‘गोकुळ’ने हे उत्पादन करावे, असे प्रयत्न सुरू होते. त्याला संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथे चीज उत्पादन प्रकल्प आहे. ते उत्पादन घेत नाहीत, त्या ठिकाणी ‘गोकुळ’ने उत्पादन सुरू केले तर त्याचा फायदा होईल. अशी चर्चाही सभेत झाली.

हरियाणा, गुजरात येथील ‘मुऱ्हा’ म्हैस खरेदीवर ‘गोकुळ’ ५० हजार रुपये अनुदान देते. त्याच धर्तीवर पंढरपुरी म्हशीला अनुदान द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.अनुदानाबरोबर म्हैशीच्या किमतीही वाढल्या‘मुऱ्हा’ म्हैशीच्या अनुदान दहा रुपयांची वाढ करत ५० हजार रुपये केले. पण, अनुदानात जशी वाढ होईल, तशा म्हैशींच्या किमती वाढू लागल्या आहेत. वर्षांपूर्वी साधारणता लाख-सव्वा लाखाला मिळणाऱ्या म्हशींच्या किमती दीड लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे वाढीव अनुदानाचा शेतकऱ्यांऐवजी संबंधित म्हैस मालकालाच अधिक होत असल्याचे काही संचालकांनी निदर्शनास आणून दिले.केर्लीप्रमाणे गडहिंग्लजला गोठा करणारएनडीडीबीच्या सहकार्याने जातीवंत म्हैशींचा केर्ली (ता. करवीर) येथे गोठा आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याच धर्तीवर गडहिंग्लज येथे गोठा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

९ सप्टेंबरला ‘गोकुळ’ची सभा‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा दि. ९ सप्टेंबरला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १८) पासून तालुकानिहाय संपर्क सभेचे आयोजन केले आहे.

संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चीज व आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरेाबर गडहिंग्लज येथे जातीवंत म्हशींचा गोठा एनडीडीबीच्या माध्यमातून सुरू केला जाणार आहे. - नविद मुश्रीफ (अध्यक्ष, गोकुळ)