Kolhapur- Gokul Sabha: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:04 IST2025-09-10T12:03:39+5:302025-09-10T12:04:14+5:30

चार वर्षांत ९ रुपयांची वाढ

Gokul Dudh Sangh will pay Rs 12 for buffalo milk and Rs 8 for cow milk, Navid Mushrif announces | Kolhapur- Gokul Sabha: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

Kolhapur- Gokul Sabha: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा 

कोल्हापूर : प्राथमिक दूध संस्थांकडून आलेल्या वासाच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ३ तर गाय दुधाला २ रुपये दिले जात होते. आमच्या काळात यामध्ये अनुक्रमे ६ व ४ रुपये अशी वाढ केली होती. वासाच्या दुधाचे प्रमाण एकूण संकलनाच्या तुलनेत खूप कमी असले तरी यामध्ये दूध संस्थांचे नुकसान होते. यासाठी या दूध दरात वाढ केली असून म्हैस दुधाला १२ तर गाय दुधास ८ रुपये दर देणार असल्याची घोषणा ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सभेत केली.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, एनडीडीबी, सिस्टीम बायो व ‘गोकुळ’च्या वतीने राबवण्यात आलेल्या बायोगॅस योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून दूध उत्पादकांना ५.९७ कोटींचे अनुदान मिळाले आहे. दूध उत्पादकांची मागणी पाहता ‘मागेल त्याला बायोगॅस’ देण्याचा मानस आहे.

वाचा : मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..

स्वत:चा नवीन दही प्रकल्प १ ऑक्टोबरपासून सुरू करत असून बटरचे उत्पादन वाढविले जाणार आहे. भविष्यातील ओला चारा व वाळलेला चारामिश्रीत ‘आयडीयल टीएमआर’ उत्पादन घेणार आहे. गडहिंग्जल चिलिंग सेंटरप्रमाणे ‘बिद्री’ चिलिंग सेंटर एक्स रे सुविधा पशुपालकांना देणार आहे.

आबाजींच्या शेजारी महाडिक यांची खुर्ची

शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर सन्मानाने येण्याचे आवाहन अध्यक्ष मुश्रीफ यांनी केल्यानंतर त्यांच्यासाठी अध्यक्षांच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या शेजारी खुर्ची ठेवली होती. त्या व्यासपीठावर न आल्याने त्यांच्या ठिकाणी अंजना रेडेकर बसल्या. त्या मात्र पहिल्यांदाच सभासदांमध्ये खुर्चीवर बसल्या होत्या.

वाचा : मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट, गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडा

मुराबरोबर आता ‘पंढरपुरी’ही म्हशी मिळणार

एनडीडीबीच्या कोल्हापुरातील गोठ्यावर मुरा जातीच्या म्हशीबरोबरच पंढरपुरी म्हशीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी संयमाने सभा चालवली. विरोधकांचे सर्व प्रश्न समजावून घेऊन त्यांनी उत्तरे दिली. वास्तविक संचालकांनी सभेत प्रश्न उपस्थित करायचे नसतात. सभासदांनी प्रश्न विचारणे अभिप्रेत असते, त्यांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. - आमदार सतेज पाटील

Web Title: Gokul Dudh Sangh will pay Rs 12 for buffalo milk and Rs 8 for cow milk, Navid Mushrif announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.