शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Gokul Dudh Sangh: मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर डोंगळेंनी दिला राजीनामा, नवीन अध्यक्ष निवड कधी.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:21 IST

कार्यकारी संचालकांकडे केला सादर : गुरुवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र त्यांच्या प्रतिनिधींनी संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे सादर केले. गुरुवारी (दि. २२) संचालक मंडळाची बैठक होत असून, यामध्ये डोंगळे यांचा राजीनामा मंजूर केला जाणार आहे. सभेच्या नोटिसा मंगळवारीच काढण्यात आल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करत अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. त्यावरून गेले सात दिवस वादळ उठले होते. रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची सूचना केली होती.त्यानुसार डोंगळे सोमवारी दुपारीच मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी सकाळी ते मंत्री मुश्रीफ यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. तिथे चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांच्याकडे राजीनामा दिला.मुश्रीफ यांचा इशारा...वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांचे बंड मोडून काढत असतानाच इतर सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिल्याची चर्चा सहकारात सुरू आहे.

सोमवारीच राजीनामा तयारअरुण डोंगळे सोमवारी मुंबईला जाण्यापूर्वी राजीनामा लिहून गेले होते. मुंबईतून त्यांनी प्रतिनिधींना फोन करून कार्यकारी संचालकांकडे देण्यास सांगितले.

नवीन निवड ३१ मेपूर्वीगुरुवारी राजीनामा मंजूर केल्यानंतर प्राधिकरणाकडून नवीन निवडीचा कार्यक्रम तातडीने घेतला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री १ ते १२ जून परदेशात जाणार आहेत. त्यानंतर निवड करायची म्हटले तर नव्याने फाटे फुटायला नको, म्हणून ३१ मेपूर्वी नवीन अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारणChief Ministerमुख्यमंत्रीMahayutiमहायुती