शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

गोकुळ दूध संघाची निवडणुक होणारच, उच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 1:16 PM

Gokul Milk Kolhapur- गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीच्या वादावर अखेर पडदा पडला असून उच्च न्यायालयाने पूर्वीचाच आदेश कायम करत गोकुळची याचिका अखेर फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याला दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देगोकुळ दूध संघाची निवडणुक होणारचउच्च न्यायालयाने याचिका अखेर फेटाळली

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीच्या वादावर अखेर पडदा पडला असून उच्च न्यायालयाने पूर्वीचाच आदेश कायम करत गोकुळची याचिका अखेर फेटाळली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही याची उत्कंठता शुक्रवारी संपली.

निवडणुकीसंदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावत आदेशानुसार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान प्राधिकृत अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी तीन हजार ६५६ सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराच्या आदेशानुसार निवडणूक ३१ मार्च पर्यंत स्थगित करावी, अशी मागणी गोकुळच्यावतीने केली होती.कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळावी, असा विनंती अर्ज गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केला होता. यावर मंगळवार दि. २ रोजी सुनावणीत न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्य केली होती. त्यानंतर पुन्हा नव्याने याचिका दाखल केली. यावर दोन वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळसह जिल्हा बँक व साखर कारखान्याच्या निवडणुकांनाही स्थगिती देण्यात आली होती. स्थगित झालेल्या टप्प्यापासून निवडणुकीची प्रकिया सुरू होईल, असे सांगण्यात आले होते, तथापि, यावरून संभ्रम निर्माण झाल्याने विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शनही मागवले; परंतु नंतर त्यांनीच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट करून त्यातील संदिग्धता दूर केली होती.

उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. प्रारूप याद्यावरील आक्षेप घेण्याची मुदत संपल्याच्या दिवशीच पुन्हा एकदा स्थगितीचा आदेश आला. गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीवर निर्णय देताना गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकCourtन्यायालय