gokul Result : तिसऱ्या फेरीअखेर आपटे, नविद, डोंगळे आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:33 IST2021-05-04T17:30:13+5:302021-05-04T17:33:46+5:30
gokul Result : गोकूळ मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर ३३ पैकी १८ जण चारशेवर मते घेत आघाडी घेतली आहे.त्यात सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी आघाडीच्या ११ जणांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे हे आघाडीवर आहेत. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले अजित व चेतन या नरके बंधूमध्ये टफ फाईट असून अजित नरके यांनी तिसऱ्या फेरीअखेर चेतन नरके यांच्यावर केवळ ७ मतांची आघाडी घेतली आहे.

gokul Result : तिसऱ्या फेरीअखेर आपटे, नविद, डोंगळे आघाडीवर
ठळक मुद्देतिसऱ्या फेरीअखेर आपटे, नविद, डोंगळे आघाडीवर दोन नरके बंधूमध्ये टफ फाईट
कोल्हापूर: गोकूळ मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर ३३ पैकी १८ जण चारशेवर मते घेत आघाडी घेतली आहे.त्यात सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी आघाडीच्या ११ जणांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे हे आघाडीवर आहेत. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले अजित व चेतन या नरके बंधूमध्ये टफ फाईट असून अजित नरके यांनी तिसऱ्या फेरीअखेर चेतन नरके यांच्यावर केवळ ७ मतांची आघाडी घेतली आहे.
- सत्ताधारी आघाडीचे रविद्र आपटे ४२६, बाळासाहेब खाडे ४४५, अंबरीश घाटगे ४७५,चेतन नरके ४५०, उदय पाटील ४४९, रणजित पाटील ४०८, रणजित बाजीराव पाटील ४०४ अशी मते घेतली आहे.
- विरोधी आघाडीचे कर्णसिंह गायकवाड यांनी ४३८, किशन चौगुले ४६३, बाबासो चौगुले ४३६, अरुण डोंगळे ४७३, नंदकुमार ढेरे ४४३, अभिजीत तायशेटे, अजित नरके ४५७, रणजित पाटी ४६५, शशिकांत पाटील चुयेकर ४७३, एस.आर.पाटील ४२०, नविद मुश्रीफ ४५२ मते घेऊन आघाडीवर आहेत.