'गोकुळ'च्या अधिकाऱ्यांनी हातात हात घालून काम करावे : नविद मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:30 IST2021-07-05T11:22:05+5:302021-07-05T12:30:09+5:30
GokulMilk Kolhapur : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर यांनी हातात हात घालून काम करावे,अशी सूचना 'गोकुळ'चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले. लिंगनूर कसबा नूल ( ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरला नूतन संचालक नविद मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.

लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरमध्ये नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांचा शाखा प्रमुख विजय कदम यांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी रवींद्र करंबळे, अविनाश जोशी,संतराम कांबळे,पी.एल.पाटील,संजय सावंत आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर यांनी हातात हात घालून काम करावे,अशी सूचना 'गोकुळ'चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले. लिंगनूर कसबा नूल ( ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरला नूतन संचालक नविद मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.
नविद मुश्रीफ म्हणाले, अधिकाऱ्यांनी दूध उत्पादकांना महालक्ष्मी पशुखाद्याची माहिती द्यावी व जास्तीत जास्त पुरवठा करण्यासंदर्भात आवाहन करावे.
यावेळी सहाय्यक व्यवस्थापक (संकलन)रविंद्र करंबळे, सहाय्यक व्यवस्थापक (पशुसंवर्धन ) डॉ. अविनाश जोशी, सहाय्यक व्यवस्थापक (डेअरी) विजय कदम, दूध संकलन अधिकारी पी. एस. पाटील, अधिकारी, सुपरवायझर व कर्मचारी उपस्थित होते.