शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

टाळ-मृदंगात पायी दिंड्या रवाना

By admin | Updated: July 19, 2015 00:29 IST

ओढ विठ्ठलाच्या भेटीला : भुरभुर पावसातही अमाप उत्साह

कोल्हापूर : जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल... पांडुरंग... पांडुरंग... असा विठुरायांचा... त्याच्या जोडीला टाळ-मृदंगाचा गजर... अशा भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापुरातून पंढरपूरला पायी दिंड्या रवाना झाल्या. पावसाची भुरभुर असूनही त्यामध्ये न्हाऊन निघणाऱ्या शेकडो भक्तांचा अमाप उत्साह शनिवारी पहायला मिळाला. पंढरपुरात भरत असलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भक्त जातात. यंदा सोमवारी (दि.२७) ही यात्रा होत आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरात भक्तांच्या दिंड्या रवाना होत आहेत. शनिवारी जिल्ह्णातून विठुरायाच्या गजरात अनेक दिंड्या निघाल्या. डोईवर फेटे, कपाळी बुक्का, गळ्यात माळ, हातात टाळ अशा रूपातील भाविक विठुरायाची भजने गात जात होते. महिलाभक्तांच्या डोईवर तुळशी होती. ठिकठिकाणी या दिंड्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत होत होते. दिवसभर पावसाची भुरभुर सुरू होती. तरीही भक्तांचा उत्साह अमाप असल्याने पावसाची तमा न बाळगता दिंड्या अंतर कापत होत्या. ठिकठिकाणी नागरिकांनी या दिंड्यांचे स्वागत करून खाद्यपदार्थ व फराळाचे साहित्य दिले. फुलेवाडी येथील विठ्ठल पंथी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मंडळाचे अध्यक्ष व दिंडीप्रमुख महादेव मेढे, उपाध्यक्ष गजानन पाटील, सचिव अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक भाविकांची दिंडी सकाळी साडेआठ वाजता फुलेवाडी येथील दत्त मंदिर येथून निघाली. ताराराणी चौक येथील गीता मंदिर येथे नाश्ता व दुपारचे जेवण शिरोली येथे भाविकांनी घेतले. रात्री मुक्काम अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे राहणार आहे. शनिवारपर्यंत दिंडी पंढरपुरात पोहोचणार आहे. याशिवाय करवीर तालुक्यातील दोनवडे, केर्लेसह कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यांतील अनेक दिंड्या टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाल्या. यामधील शेकडो भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.(प्रतिनिधी)