शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन कंपनीच्या माध्यमातून गूळ आता युरोपला जाणार

By admin | Updated: January 24, 2015 00:08 IST

गूळ उत्पादकांचा निर्णय : ‘जी.आय.’च्या कार्यशाळेस प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला गुळासाठी मिळालेल्या ‘जी.आय.’चा वापर प्रभावीपणे करण्यासाठी गूळ उत्पादन कंपनी स्थापना करून गूळ युरोपला निर्यात करण्याचा निर्णय गूळ उत्पादकांनी घेतला. ‘जी.आय.’ची अंमलबजावणीबाबत आज, शुक्रवारी समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये गूळ उत्पादकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदा गुऱ्हाळमालकांचे ‘जी.आय.’ रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. प्रा. गणेश हिंंगमिरी यांनी ‘जी.आय.’बाबत माहिती देण्यास सुरुवात केली पण त्यांना रोखत दीड वर्षांपूर्वी समितीला ‘जी.आय.’ मिळाला, पण त्याची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल गूळ उत्पादकांनी केला. त्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा कसा होणार याची माहिती द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावर बोलताना प्रा. हिंगमिरी म्हणाले, परदेशात गूळ पाठविण्यासाठी ‘जी.आय.’ गरजेचा आहेच पण त्याबरोबर व्हिसा आवश्यक असतो. यासाठी प्रत्येक गूळ उत्पादकाच्या नावावर ‘मान्यताप्राप्त कर्ता’ अशी नोंदणी होणे गरजेचे आहे. या नोंदणीतून केवळ गूळच नव्हे तर गुळापासून तयार होणारे उपपदार्थही निर्यात करता येतात. केवळ शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून चालणार नाही, गूळ उत्पादक कंपनीची स्थापना करून त्याच्या माध्यमातून गूळ निर्यात करूया, अशी मागणी करत अरुण देसाई (तेरणी) म्हणाले, एका दिवसात कोणताही पदार्थ निर्यात होत नाही, त्यासाठी मोठी प्रक्रिया असते. आपण आळसी आहोत, किती दिवस बाजार समितीवरच अवलंबून राहायचे, मानसिकता बदलून पुढे जाणे गरजेचे आहे. त्याला सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. शामराव कुंभार (वारनूळ), भगवान काटे, हिंदुराव तोडकर (वाकरे) यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. समितीचे साहाय्यक सचिव मोहन सालपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसचिव विजय नायकल यांनी आभार मानले. गूळ उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, आदम मुजावर, अ‍ॅड. अजित पाटील आदी उपस्थित होते. दोनच गुऱ्हाळघरे मानांकनास पात्र!‘जी.आय.’ मानांकन वापराबाबत समितीने ४३ गुऱ्हाळघरांचा सर्व्हे केला. यामध्ये केवळ दोनच गुऱ्हाळघरांवर गूळ हे मानांकन वापरण्यास पात्र होते, अशी माहिती समितीचे सचिव संपतराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांची उदासीनता !गूळ व्यवसाय परवडत नाही, चांगला दर मिळाला पाहिजे, अशी घरात बसून ओरड करणारे गूळ उत्पादक असल्याने संघटितपणे गूळदराचा प्रश्न मार्गी लागला नाही. ‘जी.आय.’बाबत महत्त्वाची कार्यशाळेला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, यासाठी समितीने सुमारे तीन हजार हँडबिलांचे वाटप केले होते, पण कार्यशाळेला केवळ पंधरा शेतकरी उपस्थित होते.