शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचेच ध्येय : मिताली गायकवाड; शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीचा सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:07 PM

विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मिताली श्रीकांत गायकवाड हिने सांगितले. शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीच्या (आर्चरी) सरावासाठी आलेल्या मिताली गायकवाड हिने ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देदेशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचेच ध्येय : मिताली गायकवाडशिवाजी विद्यापीठात तिरंदाजीचा सराव

संतोष मिठारीकोल्हापूर : विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मिताली श्रीकांत गायकवाड हिने सांगितले.शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीच्या (आर्चरी) सरावासाठी आलेल्या मिताली गायकवाड हिने ‘लोकमत’शी संवाद साधला.

जकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या पॅरा एशियन गेम्स्मध्ये तिने सेकंड रँक पटकाविली. त्यासह विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये यश मिळविल्याने आत्मविश्वासात भर पडली असल्याचे मितालीने सांगितले. नेदरलँडमध्ये जून २०१९ मध्ये पॅराआर्चरीची वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि टॉप-टेन रँकिंगसाठीची स्पर्धा होणार आहे. त्यातील रँकिंगसाठीच्या स्पर्धेत देशभरातील ४० खेळाडूंचा समावेश आहे. त्यातून अव्वल १0 खेळाडूंची निवड होणार आहे.

या स्पर्धेतील यश हे टोकिओ (जपान) येथे सन २०२० मध्ये होणाऱ्या पॅराआॅलिम्पिक स्पर्धेतील सहभागासाठी महत्त्वाचे आहे; त्यामुळे जकार्तामधील स्पर्धा झाल्यापासून नेदरलँडमधील स्पर्धेसाठीची तयारी सुरू केली. रोज सकाळी सात ते साडेअकरा आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत सराव करते. व्हीलचेअरवरून स्पर्धा खेळणारी मी एकमेव खेळाडू आहे. प्रशिक्षक रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव सुरू आहे. शिवाजी विद्यापीठात रविवार (दि. ६) पासून तीन दिवस सराव केला. विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. पी. टी. गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मिताली हिने सांगितले.

आता पुण्यामध्ये सरावसरावातील एक वेगळेपण म्हणून राज्यातील विविध शहरांतील मैदानांवर जाऊन तयारी करीत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत बालेवाडी (पुणे), डेरवण (रत्नागिरी) आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सराव केला आहे. त्यातून एक वेगळा अनुभव आला. आता जूनपर्यंत पुणे येथेच सराव करणार असल्याचे मितालीने सांगितले. 

 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाkolhapurकोल्हापूर