शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

गोव्याच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल, गडहिंग्लजमध्ये कारवाई; सांगलीचे दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:34 IST

गडहिंग्लज : गोवा बनावटीच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल लावून विकणाऱ्यासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकाश बळीराम चव्हाण (रा. कोणीकोणूर, ता.जत, ...

गडहिंग्लज : गोवा बनावटीच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल लावून विकणाऱ्यासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकाश बळीराम चव्हाण (रा. कोणीकोणूर, ता.जत, जि.सांगली), अनिल विकास सोलनकर (रा. माडग्याळ, ता. जत, जि.सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह गोवा बनावटीची १६ बॉक्स दारू मिळून ६,५४,५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरी येथे ही कारवाई केली.अधिक माहिती अशी, गोवा बनावटीच्या दारूची चंदगड-गडहिंग्लज मार्गे वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याला खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरी येथे सापळा लावण्यात आला होता. चंदगडकडून गडहिंग्लजकडे येणाऱ्या (एमएच १०, डीव्ही ९८७०) चारचाकीची झडती घेतली. त्यात केवळ गोव्यात विक्रीचा परवाना असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याचे १६ बॉक्स आढळून आल्याने मद्यासह ते वाहन जप्त करण्यात आले. छाप्यातील मद्य गोवा येथील वसंत जगन्नाथ मलिक (बंटी वाईन्स) मधून खरेदी केल्याचे तपासात समोर आले.दरम्यान, पथकाने आरोपी चव्हाण याच्या कुणीकोनूर येथील हॉटेल गोटू (जान्हवी) मध्ये झडती घेतली. त्यावेळी गोवा बनावटीच्या मद्य मॅक्डोवल नंबर १, रिझर्व्ह व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ३२ सिलबंद बाटल्या सापडल्या. तसेच बाटल्यांना चिकटवण्याकरिता वापरले १ हजार बनावट लेबल्स, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्की १८० मिलीच्या २ हजार बनावट लेबल्स व बाटल्यांच्या टोपणावर लावण्यासाठी बारामती येथील एका कंपनीचे नाव व घोषवाक्य असलेले ५०० बनावट प्लास्टिक स्टीकर आढळून आले.यावरून आरोपी चव्हाण हा गोवा बनावटीच्या बाटलीवरील लेबल काढून बाटली व टोपणावर महाराष्ट्रात विक्रीकरिता असे बनावट लेबल चिकटवून महाराष्ट्रातील दराने त्या मद्याची विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. त्याने बाटली व टोपणावर लावण्यात येणारे स्टिकर व लेबल संकेत संजय मुळावकर (रा. जोडभावी पेठ, ता.सोलापूर जि.सोलापूर) याच्याकडून घेतल्याचे चौकशीत सांगितले. त्यामुळे मुळावकर यालाही राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मुळावकरने ‘ते’ स्टिकर व लेबल्स विलास विठ्ठल पोतु (रा.घोंगडे वस्ती, सोलापूर) याच्याकडून घेत असल्याचे सांगितले. तपासणीदरम्यान एकूण ६,८६,६४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर, जवान देवेंद्र पाटील, आशिष पोवार, आदर्श धुमाळ, सुशांत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना सांगली व सोलापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत अधिक तपास करीत आहेत.

स्टिकर व लेबल्स् हुबेहुबलेबल व स्टीकर चिकटवल्याने बाटली ही हुबेहूब महराष्ट्र राज्याकरिताच विक्रीस आहे असे दिसते. स्टीकर व लेबल्सदेखील महराष्ट्र राज्याकरिता विक्रीस असलेल्या मद्याच्या बाटल्यांवर असतात अगदी त्याच पद्धतीने हुबेहूब छापल्याचे उघडकीस आले.

रॅकेटचा पर्दाफाशगोवा बनावटीच्या दारूवरील लेबल काढून त्यावर महाराष्ट्र राज्याचे लेबल चिकटवून लोकांची दिशाभूल आणि राज्य शासनाचा महसूल बुडविणाºया रॅकेटचा पदार्फाश झाला. यामध्ये आणखी कांहीजणाचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागSangliसांगलीSolapurसोलापूर