शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या भूसंपादन, पुनर्वसनाला प्राधान्य द्या; अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:20 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासह, बाधितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्रित कामांचे क्रम निश्चित करावेत. प्रथम आवश्यक कामांना निधी खर्च करावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी दिल्या.बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या श्री जोतीबा विकास आराखडा, खिद्रापूर, सारथी इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशा विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने यांची प्रमुख उपस्थिती होती.म्हैसकर म्हणाल्या, सर्व मंजूर कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत. प्रत्येक कामांचे विविध टप्प्यांमध्ये विभागणी करून आराखडे सादर करावेत. प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामे हाती घ्या. निधी प्राप्त होईल तशी पुढील कामे मंजुरीसाठी घ्यावीत. कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रथम विचार करावा.जिल्हाधिकारी येडगे यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी प्रास्ताविक केले. बैठकीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई, श्री जोतिबा मंदिरातील कामांची पाहणी केली. कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचीही त्यांनी माहिती घेतली.