शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गोकुळची सत्ता द्या, ८५ टक्के परतावा देऊ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 1:51 PM

Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या सत्तारुढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्‍तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करुन देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला विजयी करुन सत्ता द्या; दूध उत्पादकांना ८५ टक्के परतावा देऊ अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. 

ठळक मुद्देगोकुळची सत्ता द्या, ८५ टक्के परतावा देऊ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील याची ग्वाहीऊसाचा फार्म्युला दूधासाठी वापरून पाठ थोपटून घेऊ नका

कोल्हापूर : गोकुळच्या सत्तारुढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्‍तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करुन देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला विजयी करुन सत्ता द्या; दूध उत्पादकांना ८५ टक्के परतावा देऊ अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. रंगनाथन समितीच्या शिफारशीनूसार ऊस उत्पादकांना उत्पन्नातील परतावा देताना ७० : ३० हा फॉर्म्युला वापरला जातो. हा फॉर्म्युला दूधासाठी नाही. दुधासाठी परतावा देताना उत्पादन खर्च वगळता सर्व परतावा दूध उत्पादकांना देणे अपेक्षित आहे. सत्तारुढ गट मात्र ऊसाचा फॉर्म्युला दुधासाठी वापरुन आपली पाठ थोपटून घेत आहे.

गोकुळचा विचार करता गोकुळला चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा होतो. म्हैस दुधाचे प्रमाणही गोकुळकडे जास्त आहे. तसेच दूध संकलनासाठी वाहतूक खर्च तलुनेने कमी आहे. पण सत्तारुढ गटाने केलेल्या गैरकारभारामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. दररोज १४ लाख लिटर दूध संकलन होत असताना २० लाख लिटर संकलन गृहीत धरुन विस्तारीकरण केले आहे. त्याप्रमाणात नोकर भरती, मशिनरी खरेदी केली आहे. याचा अतिरिक्त भार गोकुळवर पडला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील दूध गोळा करुन ते संघाकडे आणल्याने कोट्यावधींचे नुकसान होते.

लेखापरीक्षण अहवालानूसार कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलनामुळे २०१५-१६ या वर्षात संघाला २४ कोटी ४४ लाख, २०१६-१७ या वर्षात ५० कोटी तर २०१७-१८ या वर्षात ६४ कोटी ७७ लाखाचे नुकसान झाले आहे. या सगळ्या फाटा देत आदर्श गोठे निर्माण करून दूध उत्पादन वाढ व पारदर्शी कारभाराच्या बळावर उत्पादकाला ८५ टक्के परतावा देऊ, असे मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर