शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पक्षाचे काम करणाऱ्यांना कमिट्यांवर नेमावे, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 4:15 PM

मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी आग्रही मागणी शनिवारी झालेल्या कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी केली.

ठळक मुद्देपक्षाचे काम करणाऱ्यांना उमेदवारी द्या, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मागणीकोल्हापूर महानगरपालिकेची आॅक्टोबर महिन्यात निवडणूक

कोल्हापूर : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पंधरा वर्षांत कोणत्या कमिट्या असतात हेसुद्धा कळले नाही, परंतु मागच्या पाच वर्षांत त्या कळाल्या, असा खोचक टोला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मारला. मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी आग्रही मागणी शनिवारी झालेल्या कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी केली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार होते.कोल्हापूर महानगरपालिकेच्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक जुने व ज्येष्ठ कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते.कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात पंधरा वर्षांत कोणत्या कमिट्या असतात हेसुद्धा कळले नाही, परंतु मागच्या पाच वर्षांत त्या कळाल्या, असा खोचक टोला अजित राऊत यांनी मारला. मागच्या काळात कमिट्या दिल्या नाहीत, त्याची पुनरावृत्ती यावेळी व्हायला नको, तातडीने कार्यकर्त्यांना कमिट्यांवर नेमावे, अशी सूचना आदिल फरास यांनी केली.

मागच्या निवडणुकीत आपापसातील राजकारण आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे पक्षाच्या २२ उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला. तसे न करता जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नगरसेवक अजित राऊत यांनी केले. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुद्धा समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून घ्यावा. प्रत्येकवेळी टोप्या बदलणाऱ्या लोकांना स्वीकृत नगरसेवक करू नका, आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा अनिल घाडगे यांनी दिला.

निवडणुकीत युवकांना प्राधान्य देण्याची सूचना महेंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक आदिल फरास, अमोल माने, प्रकाश पाटील, निरंजन कदम, अनिल कदम, प्रकाश पाटील-सरवडेकर, आप्पासाहेब बेडगकर, शीतल तिवडे यांनी सूचना केल्या. माजी नगरसेवक रामदास भाले यांनी आभार मानले. यावेळी नंदकुमार मोरे, संभाजी देवणे, अनिल आवळे, संजय कुराडे, संजय पडवळे, सुहास साळोखे उपस्थित होते.

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर