कोल्हापुरात शाळेत जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून विनयभंग, संशयितास अटक
By उद्धव गोडसे | Updated: August 24, 2023 18:17 IST2023-08-24T18:16:55+5:302023-08-24T18:17:09+5:30
शाळेला जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी निहाल उर्फ अकबर जैरुद्दीन नालबंद (रा. तपोवन कॉलनी, कोल्हापूर) याला अटक केली.

कोल्हापुरात शाळेत जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून विनयभंग, संशयितास अटक
कोल्हापूर : शाळेला जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी निहाल उर्फ अकबर जैरुद्दीन नालबंद (रा. तपोवन कॉलनी, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित निहाल नालबंद आणि त्याचा अल्पवयीन मित्र हे दोघे राजोपाध्येनगर परिसरातील शाळेला जाणाऱ्या मुलींच्या मागे दुचाकीवरून जाऊन अश्लील हावभाव करीत होते. आठ दिवसांपूर्वी घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला होता. आईने त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र, बुधवारी (दि. २३) सायंकाळी पुन्हा दोन संशयितांनी मुलींना वाटेत अडवून अश्लील हावभाव करीत त्यांचा विनयभंग केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून नालबंद याला अटक केली, तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पठवले.