गणेशाेत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात बंदी

By उद्धव गोडसे | Updated: September 20, 2023 15:22 IST2023-09-20T14:14:16+5:302023-09-20T15:22:29+5:30

नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ

Gautami Patil programs banned in Kolhapur | गणेशाेत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात बंदी

गणेशाेत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात बंदी

कोल्हापूर: नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर कोल्हापुरात बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.

मंगलमूर्ती मोरया, एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार अशा जयघोषात काल, मंगळवारी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. ढोल, ताशाच्या गजरात, डीजेच्या दणदणाट तरुण मंडळांनी काल जल्लोषी मिरणुका काढल्या. अशातच कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव अन् राधानगरीतील राशिवडे येथे नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे काही तरुण मंडळांनी आयोजन केले होते. मात्र पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ आहे. तिच्या अदा अन् नृत्याने तरुणाई घायाळ झाली आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात मोठे राडे देखील झाले आहेत. यामुळे गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून कोल्हापुरात तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: Gautami Patil programs banned in Kolhapur