शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

भुयेवाडीत गव्याचा हल्ला; तरूण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 10:49 PM

Gaur : पंचगंगा नदीच्या काठावर शुक्रवारी दिवसभर गवा बसून होता. रात्री तो गवा शिवाजी पुलावरून शिंगणापुरकडे गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भुयेवाडी त गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार झाला. अन्य दोघे जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी पावणे  सातच्या सुमारास गावातील प्रल्हाद पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ गव्याने हा हल्ला केला. सौरभ संभाजी पाटील (वय २१) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गव्याने त्याच्या पोटात शिंग खुपसल्याने त्याचा कोथळा बाहेर पडला. प्रल्हाद पांडुरंग पाटील (वय ५५) व शुभम महादेव पाटील ( वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पंचगंगा नदीच्या काठावर शुक्रवारी दिवसभर गवा बसून होता. रात्री तो गवा शिवाजी पुलावरून शिंगणापुरकडे गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हाच धिप्पाड गवा शनिवारी सायंकाळी भुयेवाडी येथे प्रल्हाद पांडुरंग पाटील यांच्या गुऱ्हाळाजवळ आला. स्वतः प्रल्हाद पाटील त्यावेळी चुलवाणाजवळ होते. तिथे त्यांच्या जनावरांचा गोठा आहे.

गवा जनावरांना मारेल या भीतीने त्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना पहिल्यांदा गव्याने उचलून फेकले. तेव्हा गावांत बराच गोंधळ उडाला. काही तरुण गव्याला हुसकावून घालवण्यासाठी पुढे सरसावले. त्यामुळे बिथरलेल्या गव्याने हल्ला केला आणि  त्यात दोन तरुण गंभीरित्या जखमी झाले. त्यातील सौरभ पाटील याचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करून गवा सादळे-मादळे गावच्या डोंगराच्या दिशेने गेला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर