शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाचे जल्लोषी स्वागत

By admin | Updated: September 6, 2016 01:15 IST

पारंपरिक वाद्याला पसंती : राजारामपुरीत डॉल्बी वाजला; पण मर्यादेत

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. दरवर्षी डॉल्बीचे आकर्षण असलेल्या राजारामपुरीत काही मंडळांचा डॉल्बी वाजला; पण तो मर्यादेत. पोलिस प्रशासनाच्या ‘नो डॉल्बी’च्या आवाहनाला काही मंडळांनी प्रतिसाद दिला. ढोलताशे, झांजपथक, अशी पारंपरिक वाद्ये आणून गणेश मिरवणुकीत रंगत आणली.पोलिसांनी जर कोणी डॉल्बीची भिंत लावली, तर तो डॉल्बी जागेवर जप्त केला जाईल, असे कडक धोरण अवलंबिले होते. त्यामुळे सोमवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरीतील गणेश मंडळे काय वाद्ये आणणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. राजारामपुरी पोलिसांनी बैठकीवेळी प्रत्येक मंडळाला मिरवणूक रांगेचे टोकन दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारपासून बागल चौकाकडे व टाकाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडळांनी नंबर लावून ठेवले होते. सायंकाळी राजारामपुरी येथील सातवी गल्ली येथील जिद्दी युवक संघटना या गणेश तरुण मंडळाची उद्घाटनानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर राजारामपुरी तालीम, शिवप्रेमी गु्रप, भगतसिंग तरुण मंडळ, हनुमान तालीम मंडळांच्या गणेशमूर्ती रात्री मुख्य मिरवणूक मार्गात सहभागी झाल्या.कडक बंदोबस्त अन् ध्वनिमापक यंत्र...राजारामपुरी येथील गणेश मिरवणुकीसाठी तीन पोलिस व्हॅनसह पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. तसेच ध्वनीची तीव्रता मोजण्याचे ध्वनिमापक यंत्र पोलिसांकडे होते.