शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गदिमा गायिले, मी धन्य झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST

कोल्हापूर : मला गदिमांच्या तोंडून रामायणातील काही गाणी ऐकायची होती. ती एकदा धाडस करून त्यांना हे सांगितले. त्यांनी त्याचवेळी ...

कोल्हापूर : मला गदिमांच्या तोंडून रामायणातील काही गाणी ऐकायची होती. ती एकदा धाडस करून त्यांना हे सांगितले. त्यांनी त्याचवेळी एकापाठोपाठ सहा गाणी म्हटली आणि मी धन्य झाले, अशा शब्दांत सुनंदा देशपांडे यांनी ग. दि. माडगुळकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या आणि उपस्थित भारावून गेले.

ग. दि. माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी अक्षर दालन येथे त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या. सुरुवातीला पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समीर देशपांडे यांनी स्वागत केले. प्रताप पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरुण सुनगार, प्रा. शशिकांत चौधरी यांनी गदिमांच्या कवितांचे वाचन केले. मिलिंद यादव यांनी माडगुळकर यांचा शिवाजी पेठेवरील लेख वाचल्यानंतर अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरुनाथ हेर्लेकर यांनी त्यांच्या गीतांचे सादरीकरण केले. रवींद्र जोशी यांनीही औदुंबर परिसर आणि गदिमा यांच्यातील नाते उलगडून दाखवले. माडगुळकर यांचे पुणे येथे लवकरात लवकर स्मारक उभारावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी एस. वाय. कोरवी, शिली खलीले, प्रमोद कुलकर्णी, डॉ. नंदुकमार जोशी, गुरुनाथ जोशी, प्रदीप चौकळे, नामदेव मोरे, माणिकराव इंदुलकर, संतोष अकोळकर, यश रूकडीकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले.

१४१२२०२० कोल माडगुळकर

ग. दि. माडगुळकर यांना सोमवारी स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.